पुणे : सणासुदीच्या मुहूर्तावर चतु:श्रृंगी पोलिसांनी भेसळयुक्त (Food and Drug Administration) तुपाचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या गुप्त कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्या कारवाईत बनावट उत्पादनाचं 650 किलोग्रॅम तूप जप्त करण्यात आलं आहे. त्यासोबतच त्याच्या मिश्रणात वापरण्यात येणारा कच्चा मालही जप्त करण्यात आला. पुणे शहरातील पाषाण गावातील भगवतीनगर येथे टिन शेडमध्ये लपलेल्या भूमिगत कारखान्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी कारखान्यावर निर्णायक छापा टाकला. छाप्यादरम्यान बुधवार पेठेतील रहिवासी असलेल्या संग्रामसिंग तेजसिंग राजपूत (38) बनावट तूप तयार करत होता. खाण्यायोग्य सोयाबीन तेल आणि डालडा यांच्या संशयास्पद मिश्रणाचा वापर करून बनावट तूप तयार करताना राजपूतला रंगेहात पकडण्यात आले.


पोलिसांच्या कारवाईत 650 किलो भेसळयुक्त तूप, 135 किलो तेल, 105 किलो डालडा, 54 रिकामे टिन कंटेनर आणि पॅकेजिंगसाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री जप्त कऱण्यात आली आहे. या सर्वांची अंदाजे किंमत 3 लाखाहून अधिक आहे.


खरेदी करताना काळजी घ्या...


दसरा, दिवाळी ही महत्वाची सणं तोंडावर आहे. यात मोठ्या प्रमाणात तुपाचा वापर होतो. मात्र स्वस्त आणि भेसळयुक्त तुपामुळे नागरिकांचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता आगहे. त्यामुळे खात्रीच्या ठिकाणावरुन तूप किंवा अन्य पदार्थांची खरेदी करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


अशी करा तक्रार ...


याबाबत प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा 2006 या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करुनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्तांनी केलं आहे. चॉकलेट, भेसळयुक्त गूळ आणि साखर वापरणाऱ्या गूळ उत्पादकावर अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येत आहे.  या सगळ्यांच्या विक्रीमुळे नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं तातडीने करावाई करण्यात येत आहे.


इतर महत्वाची बातमी-


Punit balan : गावभर होर्डिंग्ज लावणं भोवलं; पुनित बालन यांना पुणे पालिकेनं ठोठावला 3 कोटी 20 लाखांचा दंड, दोन दिवसांत दंड भरा नाहीतर...