Pune Bypoll Election Results 2023 : पुण्यातील चिंचवड- कसब्याचा पोटनिवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसबा मतदारसंघाची (Kasba Bypoll Election) मतमोजणी भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरु झाली आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहेत. ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
चिंचवडमध्ये मतमोजणीच्या 37 फेऱ्या
चिंचवड मतदारसंघाची (Chinchwad Bypoll Election) मतमोजणी शंकर आण्णा गावडे कामगार भवनमध्ये सुरु झाली आहे. मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप (BJP) उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात उतरले होते. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार हे पहावं लागणार आहे. ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे सगळ्या नेत्यांचं आणि राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. सत्तांतर झाल्यानंतरही ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीवरुन राज्याची पुढची गणितं ठरणार आहेत.
कसब्यात भाजपकडून हेमंत रासने आणि कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यात तगडी लढत आहे तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत आहे. भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत आहे. या सगळ्यांनीच मागील काही दिवस प्रचारासाठी मोठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोणता उमेदवार बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
एक्झिट पोलचा अंदाज
स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला. त्यात भाजपला धक्का बसेल असं सांगण्यात आलं आहे. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे 15,077 मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं आहे. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या 32,351 मतांनी विजयी होतील, असा अंदाज स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला आहे. एक्झिट पोलनुसार, चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93,003 मतं तर अपक्ष उमेदवार 60,173 मतं मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यात भाजपला धक्का बसेल असं सांगण्यात आलं आहे. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे 15,077 मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं आहे. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या 32,351 मतांनी विजयी होतील, असा अंदाज स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला आहे. एक्झिट पोलनुसार, चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93,003 मतं तर अपक्ष उमेदवार 60,173 मतं मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.