Pune bypoll election : पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. सोमवार पेठेतील एका इमारतीत गणेश बिडकर हे भाजपच्या इतर कार्यकर्त्यांसह पैशांचे वाटप करत असताना कॉंग्रेसचे कार्यकर्ते तिथे पोहचले आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमधे झटापट देखील झाली असं कॉंग्रेस कार्यकर्त्यांच म्हणणं आहे. या व्हिडीओमधे गणेश बिडकर कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या अंगावर धावून गेल्याचे दिसत आहेत. त्यानंतर कॉंग्रेसचे कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी समर्थ पोलीस ठाण्यात पोहचले आहे. गणेश बिडकर आणि कॉंग्रेसकडून एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या जात आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे माजी नगरसेवक आणि महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत कॉंग्रेसचे कार्यकर्ते सोमवार पेठेतील एका इमारतीत घुसले. त्या ठिकाणी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. माजी नगरसेवक गणेश बिडकर यांनी यावेळी मोबाईल शूटींग करणाऱ्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.
गणेश बीडकर काय म्हणाले?
भाजपचे मुस्लिम समाजातील कार्यकर्ते मुस्लिम समाजातील मतदारांना मतदान प्रक्रिया समजून सांगत होते आणि मतदानासाठी आवश्यक त्या स्लीप वाटत होते. त्यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही भाजपच्या उमेदवाराला मतदान का करता असं विचारुन मारहाण केल्याचा आरोप गणेश बिडकर यांनी केला. तर गणेश बिडकर हे पैसै वाटत होते आणि त्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केली असं कॉंग्रेस कार्यकर्त्यांच म्हणणय. या प्रकारानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरुद्ध मारहाणीची तक्रार समर्थ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येतेय.