Rahul Kalate Deposite : पुण्यातील पुणे चिंचवड मतदारसंघातील बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचे (Rahul Kalate) डिपॉझिट जप्त झाले आहे. राहुल कलाटे यांना डिपॉझिट राखण्यासाठी 47 हजार 833 इतकी मतं आवश्यक होती. हा आकडा पार करु न शकल्यानं कलाटेंचं डिपॉझिट (Election Security Deposit)  जप्त करण्यात आला आहे. 


कलाटेंसह 26 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त


चिंचवड विधानसभेत भाजपच्या अश्विनी जगताप यांचा 36 हजार 168 मतांनी दणदणीत विजय झाला. मविआचे (Mahavikas Aghadi) बंडखोर राहुल कलाटेंमुळे हा विजय सुकर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटेंच्या पराभूताला तेच कारणीभूत ठरल्याचं मविआचं म्हणणं आहे. मविआची डोकेदुखी वाढवणाऱ्या कलाटेंचे मात्र डिपॉझिट जप्त झालं आहे. कलाटेंना 44 हजार 82 मतं पडली. पण डिपॉझिट राखण्यासाठी 47 हजार 833 इतकी मतं आवश्यक होती. हा आकडा पार करु न शकल्याने कलाटे यांचं डिपॉझिट जप्त झालं. कलाटेंसह 26 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं.


निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा उमेदवार जागेवर एकूण मतदानाच्या 1/6 टक्के म्हणजेच 16.66% मते मिळवू शकला नाही, तेव्हा त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते. चिंचवडमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार नाना काटे यांना 99343 मते पडली आहेत. नाना काटे यांना एकूण मतदानाच्या 1/6  टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे नाना काटे यांचे डिपॉझिट जप्त होणार नाही. तर कलाटे यांना अनामत रक्कम वाचवण्याकरता 3751 मतांची गरज होती.  


कसब्यात अभिजीत बिचुकलेसह 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त


कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचे डिपझिट जप्त होणार नाही. मात्र 14 उमेदवरांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. यामध्ये अभिजीत बिचकुलेचा देखील समावेश आहे. बिचुकलेला 47 मतं मिळाली आहेत. डिपॉझिट वाचवण्यासाठी 23 हजार मतांची गरज आहे. 


चिंचवडमध्ये डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची नावे


प्रफुल्ला मोतलिंग
मनोज खंडगळे
तुषार लोंढे
सतिश कांबिये
अजय लोंढे
अनिल सोनवणे
अमोल सूर्यवंशी
किशोर काशीकर
गोपाळ तंतारपाले
चंद्रकांत मोटे
जावेद शेख
दादाराव कांबळे
बालाजी जगताप
सुभाष बोधे
डॉ. मिलिंदराजे भोसले
मिलिंद कांबळे
मोहन म्हस्के
रफिक कुरेशी
रविराज काटे
श्रीधर साळवे
सतिश सोनावणे
सुधीर जगताप
हरिश मोरे


कसब्यातील  डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची नावे


तुकाराम ढपाळ
बलजित सिंह कोचर
रविंद्र वेदपाठक
अमोल तुजारे
आनंद दवे
पांडुरंग इंगळे
चंद्रकांत मोटे
संतोष चौधरी


किती असते अनामत रक्कम?


प्रत्येक निवडणुकीतील अनामत रक्कम वेगवेगळी असते हे समजलं असेलच. लोकसभआ आणि विधानसभा निवडणुकीची अनामत रक्कमेचा उल्लेख रिप्रेझेन्टेटिव्ह्स ऑफ पीपल्स अॅक्ट, 1951 मध्ये तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या अनामत रक्कमेचा उल्लख प्रेसिडेट अॅण्ड व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन अॅक्ट, 1952 मध्ये करण्यात आला आहे.


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य वर्ग आणि एससी-एसटी वर्गातील उमेदवारांसाठी वेगवेगळी अनामत रक्कम असते. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीत सर्व वर्गातील उमेदवारांसाठी समान अनामत रक्कम असते. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्य गटातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम 10 हजार रुपये असते. तर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये जमा करावे लागतात.