Pune Crime News Update : नव्या वर्षाला सुरुवात झाली पण पुण्यातील (Pune News) गुन्हेगारी कृत्य काही कमी व्हायची नाव घेत नाही. पुण्यातील विविध भागात जीवघेणं हल्ले सुरुच आहेत, त्याशिवाय काही भागात कोयाता गँगची (koyta gang) दहशत आहेच. तर अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली जातेय. अशातच बोपोडीत भरदिवसा रस्त्यावरच एका तरुणाला संपवलं. 2 जानेवारी रोजी ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, दोन्ही हल्लेखोर हे अल्पवयीन आहेत. बोपोडीतील भरदुपारी (Bopodi, Pune) रस्त्यावर झालेल्या या घटनेमुळे पुणे शहर हादरलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून दोन अल्पवयीन तरुणांनी हे कृत्य केलेय. खडकी पोलीस स्टेशनमध्ये (khadki police station) याबाबत गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी (Pune police) या प्रकरणाचा तपास सुरु केलाय. खून केल्यानंतर आरोपींनी धूम ठोकली आहे, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 


पूर्ववैमनस्यातून हल्ला, आरोपी पसार 


खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बोपोडी येथे दोन अल्पवयीन मुलांनी भररस्त्यात एका तरुणाला निर्घृणपणे संपवलं.  भर दिवसा घडलेल्या या घटनेनेमुळे बोपोडी परिसरात भीतीचं वातावरण झालं. सगळीकडे याच प्रकरणाची चर्चा सुरु आहे. बोपोडी येथील 22 वर्षीय धीरज प्रदीप भोसले याला दोन अल्पवयीन तरुणांनी संपवलं. खून केल्यानंतर दोन्ही अल्पवयीन आरोपी पसार झाली आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, मयत धीरज याच्यावर यापूर्वी एक गुन्हा दाखल होता. तर मारेकरी दोघेही अल्पवयीन आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


भरदिवसा, सर्वांसमोरचं जीव घेतला 


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 22 वर्षीय मयत धीरज याचे आरोपीच्या भावासोबत भांडण झालं होतं. याचाच राग आरोपींच्या मनात होता. पूर्ववैमनस्यातील रागाच्या भरात दोघांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास धीरज याला संपवलं. धीरज याला बोपोडी परिसरातील भर रस्त्यात गाठले. दोन्ही आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने धीरज याच्यावर सपासप वार केले. बोपोडीमध्ये भरदुपारी हा प्रकार रस्त्यावरच सुरू होता. अल्पवयीन मुलं सपासप वार करत होते अन् हे सर्व पाहण्यासाठी जमावाने मोठ्या प्रमाणात गर् केली.  तरीही दोन्ही अल्पवयीन मुलांनी सर्वांसमोर हल्ला करुन धीरजचा निर्घृण केला. पोलीस भाषेत त्याला ब्रूटल मारल्याची चर्चा शहर पोलीस दलात होती. 


पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केलाय. बोपोडीत पूर्ववैमनस्यातून घडलेल्या या खूनाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.