पुणे :  भाजपचे ज्येष्ठ आणि सध्या पुण्याचे खासदार असलेले गिरीश बापट (Girish Bapat)आपल्या वक्तव्यांमुळं नेहमी चर्चेत असतात. परवा देखील त्यांनी पुण्यात पार  (Pune News Update)  पाडलेल्या एका कार्यक्रमात एक वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कार्यक्रमात गिरीश बापट यांचं कौतुक करताना अॅड सुरेश पलांडे यांनी म्हटलं की, गेल्या 40 वर्षांत ज्यांना कुणी हरवू शकले नाहीत, असे पुण्याचे खरे बाजीराव म्हणजे गिरीश बापट हे आहेत. हे ऐकल्यानंतर मिश्किल बापटांनी डोक्याला हात लावला. मात्र त्यानंतर 'मी बाजीराव आहे तर माझी मस्तानी कुठंय' असे म्हणत बापटांनी पलांडे यांच्या वक्तव्यावर मिश्किल टिप्पणी केली.

  


पुणे-पाबळ या पीएमपी बससेवा उद्‌घाटनाच्या निमित्ताने शनिवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच कार्यक्रमात खासदार गिरीष बापट यांचं हे अनोखं रूप पाहायला मिळालं. बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकहानीमुळे पुणे-पाबळ जसे जगभरात चर्चेत होते. त्याच धर्तीवर हा मार्ग पीएमपी बससेवेने पुन्हा जोडला. हे काम खासदार गिरीश बापटांनी केल्याने बापटच पुण्याचे बाजीराव आहेत असं अ‍ॅड. पलांडे म्हणाले.


यावर 'मी बाजीराव तर माझी मस्तानी कुठंय' असं बापट यांनी म्हटल्यानंतर अ‍ॅड. पलांडे म्हणाले की,  'तुम्ही खरोखरच बाजीराव आहात. पण, तुमच्या मस्तानीबद्दल आम्हाला अजून काहीही माहिती मिळालेली नाही'. या कार्यक्रमातील दोघांच्या संवादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून बापटांच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
 
गिरीश बापट यांनी आधीही केली आहेत वादग्रस्त वक्तव्य
खासदार गिरीश बापट यांनी याआधीही मिश्किल शैलीत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. एका कार्यक्रमात तरुणाईशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, 'तुम्ही ज्या व्हिडिओ क्लिप पाहता, त्या आम्ही पण रात्रीच्या पाहतो, आम्ही पिकलेलं पान असलो तरी आमचे हिरवे देठ आहेत, असे वक्तव्य गिरीश बापट यांनी सप्टेंबर 2015 मध्ये पुण्यात केले होते. नवरा बायकोच्या भांडणापेक्षा ठेवलेलीचा जास्त त्रास होऊ लागला आहे. पण ठेवलेली घरात आली की नवरा-बायकोची भांडणे वाढणारच, अशी वादग्रस्त टिप्पणी मंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केली होती.


संबंधित बातम्या 


आमदार प्रशांत परिचारक यांची प्रचार सभेत जीभ घसरली  भाजपच्या नेत्यांना झालंय तरी काय?  


आरक्षणामुळे ब्राह्मण मुलं परदेशात जातात : मुक्ता टिळक 


आधी गुंडांना निवडून आणू, मग त्यांना सुधारु : सुभाष देशमुख 


वर्षभरानंतर सरकार बदलणार, गिरीश बापटांचं खळबळजनक वक्तव्य  


'होय, मी पण 'त्या' क्लिप रात्री बघतो', मंत्री गिरीष बापट यांची विद्यार्थ्यांसमोर कबुली   नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य