Pune Suicide : ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) चौथ्या मजल्यावरून उडी मारून बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (BJ Medical College) अदिती दलभंजन या 20 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली. विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र दुर्दैवाने वाचवण्यात यश आले नाही. नैराश्यात असल्याने तिने टोकांचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. 


सिंहगड रोडच्या आनंदनगरमध्ये राहणारी अदिती नैराश्यात होती आणि तिच्या कॉलेजच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी धडपडत होती. बुधवारी सकाळी तिच्या वडिलांनी तिला कॉलेजमध्ये सोडले होते, मात्र अदितीने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सध्या पोलीस तपास करत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिती परीक्षेच्या निकालामुळे घाबरली होती. तिने तिच्या समस्या तिच्या मित्र आणि वडिलांना सांगितल्या होत्या. बुधवारी तिने तिची बॅग वर्गात ठेवली आणि प्रात्यक्षिक परीक्षेला बसली नाही. त्याऐवजी तिने जुन्या ट्रॉमा सेंटरच्या टेरेसवर जाऊन उडी मारली. तिने आपला मोबाईल टेरेसच्या भिंतीवर ठेवला होता.


अदिती ही आपल्या आई-वडिलांबरोबर आनंदनगर येथे राहण्यास असून, ती अभ्यासात अतिशय हुशार होती. तिने चांगल्या पध्दतीने अभ्यास करून व चांगले गुण संपादन करून बी.जे. मेडिकलला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. परंतु कॉलेजच्या परीक्षेचा अभ्यास न झाल्याने तिला काही प्रमाणात नैराश्य आले होते. तिने वडिलांना याची कल्पनादेखील दिली होती. बुधवारी सकाळी तिचे वडील तिला नेहमीप्रमाणे तिच्या कॉलेजमध्ये सोडून गेले. परंतु, अभ्यास न झाल्याने तिने ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिने आत्महत्या करताना तिचा मोबाईल टेरेसवरच ठेवला होता. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आला असून, पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहे.अदितीला नेहमीप्रमाणे कॉलेजला आल्यानंतर तिने काल साडेदहाच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.


नैराश्येतून आत्महत्येत वाढ


सध्या पुणे शहरात आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. क्षुल्लक  कारणावरुन अनेक तरुण आत्महत्येचं पाऊल उचलताना दिसत आहे. कोरोनानंतर अनेक विद्यार्थी नैराश्यात आहेत. सोशल मीडियामुळे नैराश्य वाढत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेकांनी शारिरीक आणि मानसिक आरोग्य जास्त प्रमाणात जपावं, असं आवाहन तज्ञांनी केलं