Pune Crime News: सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारामती शहरातील नीरा कालव्याजवळ ही घटना घडली. सरस्वती गुणवंत तोंडारे असं या महिलेचं नाव आहे.


नेमकं काय घडलं?
सरस्वती या दोन दिवसांपुर्वी आपल्या मुलीकडे रहायला आल्या होत्या. त्याानंतर सगळी त्या शहरातील नीरा डावा कालव्याच्या भरारावर गेल्या. यावेळी चालताना त्यांचा पाय घसरला. त्या नीरा कालव्यात घसरत गेल्या. याच घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पती पोलीस कर्मचारी होते. गेल्या काही दिवसांपुर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते.


सकाळी पुलाजवळ या महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह दिसल्यानंतर बीट मार्शल ठोंबरे यांनी स्थानिकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात आली, असं शहराचे पोलीस निरिक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले.


अस्तीकरणामुळे अनेक दुर्घटना
बारामतीत सिमेंटच्या स्लॅबचे अस्तीकरण करण्यात आल्याने यासारख्या दुर्घटना होत आहे. या अस्तीकरणामुळे जर एखादी व्यक्ती घसरुन पडल्यास त्या व्यक्तीला वर काढणे किंवा येणे कठीण आहे. वर येण्याचा प्रयत्न केला तरीदेखील शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडतात.


या परिसरात पाण्याच्या प्रवाहाला वेग असतो. त्यामुळे अनेकदा बाहेर येणं शक्य नसतं. त्यामुळे घसरल्यावर बाहेर येण्याची शक्यता कमी असते. यापुर्वी मात्र वर येणं शक्य होतं. कालव्याच्या आजुबाजूच्या परिसरात दोन्ही बाजूला माती, गवत, झुडपे असल्याने त्याला धरुन जीव वाचवणं शक्य होतं.


सेल्फीच्या मोहात बुडून मृत्यूचे प्रमाण जास्त


सेल्फीच्या मोहात बुडून मृत्यू झालेल्यांचं अधिक प्रमाण आहे. असाच प्रकार हरिहरेश्वर येथे घडला होता. फोटो काढत असताना महिला पर्यटक लाटाच्या जोरदार फटक्यामुळे समुद्रात पडली. समुद्रात पडलेल्या महिला पर्यटकाला वाचविण्यासाठी दुसऱ्या पर्यटकांने पाण्यात उडी घेतली. महिला पर्यटकास वाचविण्यात तालुका प्रशासनास यश आले मात्र पुरुष पर्यटकास त्याच्या प्राणास मुकावे लागले होते. विकास रामचंद्र काळे (वय 53) आणि मनिषा जयेश मेटे-दळे (वय 49)  हे  पुण्यातील  पर्यटक मौजमजेसाठी हरिहरेश्वर येथील समुद्रात पोहण्यासाठी गेले.