सुजाता श्रॉफ या महिलेनं सोमवारी बाणेर परिसरात बेदरकारपणे कार चालवत रस्ता ओलांडणाऱ्या पाचजणांना चिरडलं होतं. यात मायलेकींचा मृत्यूही झाला होता. दोघांचा मृत्यू होऊनही पोलीस सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करत नाहीत, असा सवाल विचारत पोलिसांवर टीका होऊ लागली होती. मात्र आता पोलिसांनी वाढीव कलमांअतर्गत चालक महिलेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
या वाढीव कलमांची माहिती पोलीस उद्या न्यायालयाला देणार आहेत. त्यानंतर चालक महिलेला पुन्हा अटक करण्याची परवानगी मागणार आहेत. श्रॉफ यांच्यावर जो आधी गुन्हा नोंद आहे, त्या गुन्ह्यामधेच सदोष मनुष्यवधाचं कलम वाढवण्यात आलं आहे.
बाणेर अपघात : दोघांचा बळी घेऊनही महिला चालकाला काही तासात जामीन
काय आहे प्रकरण?
पुण्यातील बाणेरमध्ये रस्ता ओलांडताना डिव्हायडरवर असलेल्या पाच जणांना कारनं उडवलं. 17 एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास इशिता आणि साजिद ही मुलं आपल्या आईसोबत डी मार्टमधून घरी परतत होते. रस्ता ओलांडताना गाड्यांची रहदारी सुरु असल्यानं तिघंही दुभाजकावर उभे होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या i20 गाडीने त्यांना धडक दिली.
पुुण्यात रस्ता ओलांडताना कारची धडक, दोन मुलांचा मृत्यू
या दुर्घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू झाला. तर तिची आई पूजा विश्वकर्मा गंभीर जखमी होत्या. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आरोपी महिला चालक सुजाता जयप्रकाश पुण्याहून बालेवाडीच्या दिशेनं जात होती. बाणेरमध्ये आल्यावर तीचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तीनं दुभाजकावरील पाच जणांना जोरदार धडक दिली.
बाणेर अपघात : लेकीनंतर आईचाही मृत्यू, बेजबाबदार महिला चालक अटकेत
सुजाता एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचं बोललं जात आहे. अपघातात चालक महिलाही जखमी झाली आहे. अपघातानंतर चालक महिला कारमधून उतरत जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती.