OBC Reservation Update : सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाबाबत काढलेला अध्यादेश रद्द केला आहे.  त्यानंतर ओबीसी आरक्षणावरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरीकल डेटा गोळा करण्यावरुन आता खलबतं सुरु आहेत. यावरुन आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 


अजित पवार यांनी म्हटलं आहे की, ओबीसी आरक्षणाचा डेटा मार्चपर्यंत गोळा होईल अशी अपेक्षा आहे.  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोगाच्या अध्यक्षांना याबाबत विचारलं होतं तेव्हा त्यांनी दोन महिन्यांत डेटा गोळा करू असं सांगितलं होतं. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न देशातील अनेक राज्यांमधे निर्माण झाला आहे.  त्यासाठी केंद्र सरकारनेच कायदा करायला हवा होता.  पण आम्ही ही मागणी केली की ते म्हणतात आम्ही टोलवाटोलवी करतो, असंही अजित पवार म्हणाले.


सावित्रीबाई फुलेंच्या 191 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगावमधे असलेल्या सावित्रीबाईंच्या स्मारकाला अभिवादन  करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते.  नायगाव मधील नेवसे वाड्यामधे हे स्मारक आहे.  3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाई फुलेंचा जन्म त्यांचे वडील खंडोजी नेवसे यांच्या नायगावमधील या वाड्यात झाला होता.  आता या वाड्याचे राज्य शासनातर्फे स्मारकामधे रुपांतर करण्यात आलंय.


या स्मारकाविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, सावित्रीबाई फुलेंच्या जन्मस्थान असलेल्या नायगावमधे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. नायगावमधे चांगले ग्रामसचिवालय उभारले जाईल. इथल्या शाळेच्या इमारतीची काहीशी दुरावस्था झालीय, त्यासाठी निधी दिला जाईल, असंही अजित पवार म्हणाले.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha





इतर महत्वाच्या बातम्या




OBC Reservation : ओबीसी आरक्षण रद्द झालं म्हणजे नेमकं काय?, सुप्रीम कोर्टाचा निर्णय सोप्या शब्दात