पुणे : पुण्यातील (Pune news) हवेची गुणवत्ता मागील (Pune air quality index) काही दिवसांपासून खराब झाली होती. मात्र काल काही परिसरात पडलेल्या पावसामुळे(Pune AQI Today) हवेच्या गुणवत्तेत थोडी सुधारणा झाली आहे. पुण्यातील (Pune Rain Update) कात्रज, खडकवासला, कोथरूड आणि सिंहगड रोड परिसरात काही प्रमाणात पाऊस पडला. मुंबईपेक्षा पुण्याच्या हवेची पातळी खराब असल्याचं आकडेवारीवरुन समोर आलं होतं. 


केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या  आकडेवारीनुसार, काल (10 नोव्हेंबर) पुण्यातील हवेची गुणवत्ता lndex (AQI) संध्याकाळी 6 वाजता 110 नोंदवण्यात आली, तर रात्री 8 वाजेपर्यंत PM 10 आणि PM 2.5 पातळी अनुक्रमे 104 आणि 66 नोंदवली गेली. याच कालावधीत मंगळवारी (9 नोव्हेंबरला) AQI 146 च्या आसपास होता. बदलत्या हवामानामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास हातभार लागल्याचे तज्ज्ञ आणि हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 


कोकण आणि लगतच्या भागात अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातही ढगाळ वातावरण असून शहरात 11 नोव्हेंबरपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. शहरातील विविध ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, काल 8 नोव्हेंबर रोजी शहरात विखुरलेल्या ठिकाणी हलका पाऊस झाला.


अरबी समुद्रातून येणारे दक्षिण पूर्वेचे वारे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात ओलावा आणत आहेत. या ओलाव्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात 9 आणि 10 नोव्हेंबरला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये 9 आणि 10 नोव्हेंबरला रिमझिम किंवा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुण्यात 8 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत वादळासह पावसाची सूचना दिली आहे. मात्र शहरात दिवसभर पाऊस पडणार नाही, असंही सांगितलं आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून हवामानाची स्थिती खराब स्थिर होती, गेल्या 24 तासांत त्यात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. वाऱ्याचा वेगही वाढला आहे आणि वातावरणातील पाण्याचा शहराच्या हवेच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होत आहे IMD च्या आकडेवारीनुसार, शिवाजीनगर येथे काल किमान तापमान 29.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि किमान तापमान 21.4 अंश सेल्सिअस होते, जे 5.7 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते.


इतर महत्वाची बातमी-


Maratha Reservation:  मराठा समाजाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धसका, मंचर एसटी आगाराचा उद्घाटन सोहळा केला रद्द