Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल याला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आता पुणे सत्र न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
जेव्हा अपघात घडला त्यावेळी सुरेंद्र अगरवाल याने त्याच्या नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. गाडी तू चालवत असल्याचं पोलिसांना सांग असं त्याने ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला सांगितलं. तसेच सुरेंद्र अगरवाल याने ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.
या आधी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांची एकत्रित चौकशी करायची आहे, त्यामुळे सुरेंद्र अगरवालला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती.
दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी पोलिसांच्या या मागणीला विरोध केला. आरोपी हा 77 वर्षांचा असून तो कुठेही पळून जाऊ शकत नाही, तसेच पुराव्यांशी छेडछाड तो करू शकत नाही असा यु्क्तिवाद केला. पण न्यायालयाने पोलिसांनी मागणी मान्य केली आणि आरोपी सुरेंद्र अगरवालला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
तपास अधिकाऱ्यांचा युक्तिवाद काय?
आरोपी वारंवार परदेशात जातो त्यामुळे त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा. घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. पण ज्या गाडीतून डायवरचे अपहरण केले होते ती गाडी जप्त करायची आहे, फोन जप्त करायचे आहेत. आरोपीने सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केली आहे. त्याचा तपास करायचा आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जर आरोपी सहकार्य करतो म्हणतात मग त्यांनी मोबाईलची माहिती का दिली नाही? ड्रायव्हरचे कुटुंबीय केसनंदला राहतात आहेत, त्यांचं तिथं घर आहे. तरी आरोपी म्हणतात ड्रायव्हर आमच्यासोबत राहतो सुरेंद्र आणि त्याचा मुलगा विशाल यांची एकत्रित चौकशी करायची आहे.
आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद काय?
आरोपी 77 वर्षांचे सिनियर सीटिझन आहेत. ही देशातील पहिली घटना असेल ज्यात अपघात प्रकरणी वडील आणि आजोबांना अटक झाली आहे. फिर्यादीचे, ड्रायव्हरचे अपघाताच्या दिवशी जबाब पोलिसांनी घेतला आहे. ड्रायव्हरच्या जीवाला धाका होता. त्याने स्वतः हून म्हटलं होतं मी आजच्या दिवस इथे राहू का? घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अनेकदा तपासासाठी नेले आहे. अनेक तास चौकशी केली आहे. त्यांनी पूर्ण सहकार्य केले आहे. आरोपीला पॅरॅलिसीसचा ॲटक आला आहे, हार्टचे ॲापरेशन झाले आहे. त्याच्या मणक्याला दुखापत आहे. ते सर्व ऑन पेपर आहे. मुलाचे वडील न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे ते कोठे पळून जात नाहीत. त्यांच्या जेलमध्ये जाऊन तपास करायला आमची हरकत नाही. आम्ही तसे लेखी देतो. म्हणून यांना पोलीस कोठडी देऊ नका. सिनीयर सीटीझन आहेत.
ही बातमी वाचा: