Pune Accident news : पुणे शहरात अपघाताचं सत्र सुरुच (Accident) असल्याचं चित्र आहे. वाहतूक कोंडी (traffic), रस्त्यांची दुरावस्ता (Road) या कारणावरुन पुण्यात (pune news) दररोज अपघात होतात. पुण्यात एकाच दिवशी दोन (Pune accident) वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात कोंढवा परिसरात झाला तर दुसरा अपघात पुणे -सोलापूर रस्त्यावर झाला आहे. दोन्ही अपघातात झालेल्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.
कोंढवा परिसरातील खडीमशीन चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर दोन तरुण होते. यात सहप्रवासी असणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओंकार गौतम वाघमारे असं 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर 20 वर्षीय दुचाकीस्वार सुमीत म्हस्के हा गंभीर जखमी झाला आहे. दोघेही कोंढवा- कात्रज रस्त्यावर कात्रजकडे जात होते. त्यावेळी भरधाव ट्रकने धडक दिली आणि अपघातानंतर ट्रकतालक पसार झाला आहे. या प्रकरणी म्हस्के याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.
दुसरा अपघात पुणे-सोलापूर रस्त्यावर उरुळी कांचन परिसरात झाला आहे. यात ट्रकने मालवाहू गाडीला धडक दिली आहे. या अपघातात मालवाहू गाडीचालक असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अविनाश शिवाजी बागडे असं 19 वर्षीय मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी अविनाश यांचे वडिल शिवाजी बागडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अविनाश बगाडे आणि त्याचे दोन मित्र हिंजवडीत माल घेऊन गेले होते. मालवाहू गाडीतून दोघेही सहजपूरकडे निघाले होते. उरळी कांचन परिसरात परिसरात पहाटे तीन च्या सुमारास दोघेही थांबले होते. मालवाहू गाडी रस्त्यांच्या बाजूला पार्क केली होती. त्यानंतर अविनाश गाडीचा दरवाजा उघडून गाडीत प्रवेश करत होता. याच दरम्यान पाठीमागून ट्रक आला आणि ट्रकने गाडीला धडक दिली. याचवेळी अविनाशचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पसार झाला आहे.
पुण्यात अपघाताचं संत्र थांबेना...
मागील काही महिन्यापासून पुण्यात अपघाताचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. गाड्यांचा भरधाव वेग, रस्त्यांची दुरावस्ता आणि रस्त्यांची चुकलेली रचना यामुळे अनेक अपघात झाले. या अपघातात अनेक निष्पाप जीवांचा बळीदेखील गेला आहे. पुण्यातील नवले पूल हा अपघाताचा हॉट स्पॉट बनला आहे. आतापर्यंत नवले पुलावर 70 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.