पुणे : पुण्यातील धनाढ्य बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोरांने आलिशान पोर्शे कारने दारूच्या नशेत कल्याणीनगरमध्ये दोघांना रस्त्यावर चिडून मारल्यानंतर पुण्यामध्ये गेल्या 25 दिवसांमध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे.


पोर्शे कार अपघात प्रकरणाने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच व्यवस्था सुद्धा कशी पोखरली गेली आहे याचा सुद्धा नमुना समोर आला. या प्रकरणात कायदेशीर कारवाईने वेग घेतला असला, तरी पुण्यामधील रस्त्यावरच्या परिस्थितीमध्ये किंचितही सुधारणा झालेली नाही. 


पुण्यामध्ये गेल्या 25 दिवसात सरासरी तीन अपघात


वाहतूक कोंडीने शहराचा जीव गुदमरत असतानाच भरधाव वाहनांच्या खाली चिडवून मृत्यूमुखी पडणाऱ्याची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. पुण्यामध्ये सरासरी तीन अपघात गेल्या 25 दिवसांमध्ये झाले आहेत. त्यामध्ये 31 जणांचा निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. इतकेच नव्हे तर 54 जण गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे जे गंभीर आहेत त्यांना सुद्धा आता आयुष्यभर अपंगत्व स्वीकारण्याची वेळ आली आहे. 


अपघातांना सर्वाधिक कारणीभूत पुण्यातील वाहनांचा भरधाव वेग


19 मे ते 14 जून 2024 या कालावधीमध्ये पुण्यामध्ये तब्बल 70 अपघात घडले आहेत. या अपघातांना सर्वाधिक कारणीभूत पुण्यातील वाहनांचा भरधाव वेग कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे भरधाव वाहनांचा वेग पुणेकरांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. दारू पिऊन वाहने चालवण्याची संख्या सुद्धा मोठी आहे. अपघात झालेल्या सर्वच प्रकरणांचा उलगडा झाला नसला, तरी काही चालक पोलिसांच्या ताब्यात आहेत. अपघातानंतर काही चालक अजूनही फरार आहेत. त्यामुळे पुण्यामध्ये अक्षरशः मृत्यूचे तांडव सुरू आहे. 


पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा हिट अँड रनच्या घटना


पुण्यामध्ये एका बाजूने अपघातांची मालिका सुरूच असताना पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष सुद्धा दुर्लक्ष सुद्धा संतापात भर घालणारे होत आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली. लोकांनी रेटा वाढवल्यानंतर कारवाईला वेग आला होता. त्यापूर्वी हे प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न झाला होता. दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा हिट अँड रनच्या घटना घडल्या. यामध्ये सुद्धा पोलिसांनी स्वतःहून कारवाई केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे पुण्यातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुण्यामधील वाहतूक कोंडी आणि भरधाव वाहने अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या