पुणे : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad News)  पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंसाठी करोडपती झाल्याचा आनंद हा क्षणिकच राहिला. ड्रीम 11 (Dream 11)  या ऑनलाईन गेममधून त्यांनी दीड कोटी जिंकले आणि त्यानंतर ते प्रसिद्धीझोतात आले आणि कारवाईच्या कचाट्यात सापडले. पीएसआय  सोमनाथ झेंडेंचे अखेर निलंबन (PSI Suspended)  करण्यत आली आहे. झेंडेंनी केलेल्या दोन चुकांमुळे त्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. 


झेंडेंच्या निलंबनाला त्यांनी केलेल्या दोन चुका कारणीभूत ठरल्या आहे. या दोन चुका इतक्या महागात पडल्या की करोडपती झालेल्या पीएसआय झेंडेंना नोकरी गमवावी लागली आहे. वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पहिली चूक वर्दीत ते ही ऑन ड्युटी ऑनलाईन गेमिंगमधून पैसे मिळवणं आणि दुसरी त्याच वर्दीत छाती ठोकपणे माध्यमांपुढं येऊन सांगणं हे वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहचवणारे आहे, असे म्हणत कारवाई करण्यात आली आहे.


झेंडेंना म्हणणं मांडण्याची संधी मिळणार


वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आलाय. पण विभागीय चौकशीत त्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे. क्रिकेट वल्ड कप मॅचवेळी झेंडेंनी ड्रीम 11 या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली अन त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत करोडपती झाले.


प्रकरण काय?


झेंडे यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे.  गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. मागील दोन- तीन महिन्यांपासून झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात  केली. झेंडे यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस सागरला मिळाले आहे. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याच बक्षिसाच्या दीड कोटींमुळे आता झेंडे यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.


हे ही वाचा :


PSI Somnath Zende Suspended: ड्रीम 11 वर दीड कोटी जिंकलेल्या पीएसआय सोमनाथ झेंडेंवर मोठी कारवाई