पुणे : पुणे शहर,  पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेन्टमध्ये  जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  विभागीय आयुक्त,  जिल्हाधिकारी , महापालिका अधिकारी  आणि पोलिस अधिकारी यांच्या एकत्रित बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वाधिक म्हणजेच 16 कोरोनाग्रस्त पुण्यात आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेची पथकं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. 30 कर्मचाऱ्यांचं एक पथक अशी सुमारे 125 पथकं महापालिकेकडून बनवण्यात आली आहेत. ही पथकं पुण्यात महिन्याभरता आलेल्या देशी-परदेशी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना कोरोनासंदर्भात माहिती देणार आहे.


जिल्ह्यात एखाद्यात लक्षणं आढळल्यास त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारीही या पथकांवर देण्यात आली आहे. मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयात त्यावर ड्राफ्ट बनवण्याचे काम सुरू आहे. पिंपरी चिंचवड मध्ये जमावबंदीचा प्रस्ताव कालच जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिला होता.


पुणे महापालिकेने 'डोअर टु डोअर' राबवलेल्या मोहिमेत अशा साडे पाच हजार लोकांची माहिती समोर आली आहे. ज्यांनी मागील एक वर्षात परदेशी प्रवास केला आहे, अशा लोकांची माहिती घेऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. गरज पडल्यास त्यांना होम कॉरेंटाइन होण्यासाठी सूचना देण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची देखील काळजी घेतली जात आहे. ही मोहीम ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत तिथून तीन किलोमीटरच्या परिसरात आणि जिथे परदेशातून प्रवास करून आलेले लोक राहत आहेत अशा भागांमध्ये प्रामुख्याने राबवली जात आहे.


#Coronavirus Positive Patients | पिंपरीत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह,पुण्यात 16 तर राज्यात 33 रुग्ण



ग्राहकांनी गजबजून गेलेल्या तुळशीबागमध्ये आज शुकशुकाट पाहायला मिळाला आहे. कारण कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी पुढचे तीन दिवस तुळशीबाग बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने येथील व्यावसायिकांना दिले आहेत. तीन दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन अजून काही दिवस बंद ठेवायलाही सांगितलं जाऊ शकतं. यामुळे व्यवसायावर नक्कीच परिणाम होईल पण लोकांचे जीव वाचणं अधिक महत्त्वाचं आहे अशी भावना इथल्या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.


पिंपरी चिंचवड महापालिकेकडुन पॉझिटिव्ह रुग्ण आढलेल्या परिसरात सर्वेक्षण केलं जातं आहे. तीन किलोमीटरच्या आवारातील सर्व नागरिकांची चौकशी केली जात आहे. पॉझिटिव्ह रुग्णांशी त्यांचा संपर्क झालाय का? किंवा त्यांच्या माहितीतील कोणी व्यक्ती रुग्णाच्या संपर्कात आलीये का? त्यांना कोणता आजार आहे का? असं सर्वेक्षण केलं जातंय. तर पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या व्यक्तीच्या घराभोवती विशेष औषध फवारणी केली जात आहे.


संबंधित बातम्या :


Coronavirus | राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37 वर, मुंबईत आणखी तीन रुग्ण आढळले


सावधान : तुमच्या फोनद्वारे कोरोनाची लागण होऊ शकते, म्हणून सतत स्वच्छ करा मोबाईल फोन


Coronavirus | ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोनाग्रस्तांसाठी आपल्या हॉटेल्सचं रूपांतर हॉस्पिटल्समध्ये करणार?