पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं असताना घटनेच्या 18 दिवसानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही. आता या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल होणार आहे. पूजा चव्हाणची चुलत आजी शांताताई चव्हाण आज गुन्हा दाखल करणार आहेत. शिवाय त्या पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. तसेच फिर्यादीत मंत्री संजय राठोड यांचेही नाव टाकणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शांताताई राठोड या तृप्ती देसाई यांच्या मदतीने वानवडी पोलिस स्टेशनला जाणार आहेत.


संजय राऊतांचं संजय राठोडांच्या राजीनाम्यासंदर्भात सूचक ट्वीट? शिवरायांचा फोटो शेअर करत राजधर्माची आठवण


एबीपी माझाशी बोलताना शांताताई म्हणाला की, पोलिसांचं म्हणणं आहे की, पूजाच्या मृत्यूला 18 दिवस झालेले आहेत. पूजाच्या मृत्यू प्रकरणात कुणीही नातेवाईक गुन्हा दाखल करायला आलेले नाहीत. म्हणून मी नातेवाईक या नात्यानं आम्ही वानवडी पोलिस ठाण्यात जाणार आहोत. पूजाच्या मृत्यूप्रकरणी कुणीही आरोपी असो मग ते अरुण राठोड, विलास चव्हाण, असो किंवा मंत्री संजय राठोड असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोवर मी पुण्यातून बाहेर जाणार नाही, असं पूजाची आजी शांताबाई यांनी सांगितलं. व्यवस्थित चौकशी झाली नसेल तर मी पोलिसांविरोधात देखील गुन्हा दाखल करणार आहे, असंही शांताताई राठोड यांनी सांगितलं.


शांताताई म्हणाल्या की, संजय राठोड, अरुण राठोड, विजय चव्हाण यांच्यावर गुन्हा करणार आहे. विजय म्हणत होता पोस्टमार्टम होऊ देऊ नका, पोस्टमार्टम रिपोर्ट कुठे गेला, फक्त मृत्यू झाला म्हणून नोंद आहे. कितीही पळवाट काढली तरी काहीही होणार नाही. आता पुढे आले नाहीतर आमच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक नंतर मंत्री संजय राठोड एकच व्यक्ती आहे म्हणून समाज पुढे येत नाही, असंही शांताताईंनी म्हटलं आहे.


त्या म्हणाल्या की, अरुण राठोडला खुप मोठं आमिष दाखवलं आहे. अरुण राठोड हा त्याच्याच घरी आहे, दिवसा बाहेर असतो रात्री घरी येतो. पूजाच्या आई वडिलांनी सत्यासाठी बाहेर यायला हवं . त्यांच्या घरच्यांवर दबाव, त्यांना लेकरांची किंमत नाही. पुजाचा खून झालाय, पूजा डॅशिंग मुलगी होती, असं त्यांनी म्हटलं आहे.


पोहरादेवीतील महंत खरे बोलत होते. ते ठिकाण राजकारण करण्याचे नाही. मंत्र्यांना महंत सपोर्ट करत असतील तर चुकीचं आहे. महंत असे करायला लागले तर समाज काय करेल, असंही शांताताई यांनी म्हटलं आहे.


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर राठोडांना फाडून काढलं असतं, खुर्ची एवढी वाईट आहे का? चित्रा वाघ यांचा सवाल


शांताताई म्हणाल्या की, पोलिसांवर दवाब असू शकतो. पोलिस कुणाच्या दबावात आहेत, हे आपण सांगू शकत नाहीत. जोवर कायद्याचा धाक नाही, तोवर हे असंच वातावरण राहिल. पोलिसांनाही धाक पाहिजे, असं शांताताई यांनी म्हटलं आहे. पोलिस स्टेशनच्या शेजारी एवढी पोलिस घटना घडली तरी साधी चौकशी पोलिसांनी केली नाही. मुलगी वरुन पडून मृत्यू झाला असं सांगितलं.


Pooja Chavan Death Case | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे लष्कर कोर्टात खटला दाखल


पूजाच्या आजीचे पोलिसांना सवाल
रात्री दोन वाजता ते दोन मुलं कशाला आले?
तिला घेऊन ते दोघं दवाखान्यात कसं येऊ शकतात?
त्यांच्यासोबत कोण कोण होते?
इथं कशामुळं राहत होते?
कोणत्या कॉलेजात शिकायला होती?
याची चौकशी झाली का?
ही चौकशी झाली नसेल तर मी पोलिसांविरोधातही गुन्हा दाखल करेल, असं शांताताई यांनी म्हटलं आहे.