पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad )  शहरातील दापोडी परिसरातील अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागात कार्यरत असणाऱ्या दोन महिला सुरक्षारक्षकांनी भाजीविक्रेत्या महिला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा भाजीचा गाडा जप्त करण्याची कारवाई करत असताना झालेल्या वादातून महिला सुरक्षा रक्षक संबधित महिलेला मारहाण करत असल्याचं व्हिडीओ मध्ये दिसत आहे. अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेनं एक पथक नेमल आहे. ज्या मध्ये MSF जवान तैनात करण्यात आले आहेत.  या जवानांची मदत घेऊन अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाते. मात्र अशी कारवाई करत असताना अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना मारहाण करता येत नाही. तरीही असे प्रकार वारंवार घडत आहेत. 


रस्त्याच्याकडेला भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा भाजीचा गाडा जप्त करण्याची कारवाई करत असताना झालेल्या वादातून महिला सुरक्षा रक्षक संबधित महिलेला मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. महिला सुरक्षा रक्षकांनी भाजी विक्रेत्या महिलेचा हात पिरगाळत, पाठीत ठोसे मारत  या भाजी विक्रेत्या महिलेला जमिनीवर ढकलून देत मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.


संपूर्ण प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप


गरीब महिला ज्या प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्याबरोबर  कर्मचारी असे का वागतात?  महिलेचा आक्रोश, कर्मचाऱ्यांची मारहाण पाहिल्यानंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.  संपूर्ण प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप बघायला मिळत आहे.


प्रशासन काय कारवाई करणार?


पिंपरी महापालिकेचे हॉकर्स धोरण अद्यापही कार्यरत होत नसल्याने अनेक पथारी धारक रस्त्याच्याकडेला भाजी आणि इतर वस्तू विकतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते आणि वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने असे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेनं एक पथक नेमले आहे.  ज्यामध्ये MSF जवान तैनात करण्यात आले आहेत. या जवानांमार्फत अतिक्रमण कारवाई केली जाते. मात्र अशी कारवाई करत असताना अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना मारहाण करता येत नाही तरी देखील अशा प्रकारची मारहाण केल्या गेल्याने आता महापालिका प्रशासन काय कारवाई करत याकडे सगळ्यांचं लक्ष लागल आहे. 


Video :


हे ही वाचा : 


Pune Accident Video: आळंदीत भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाने महिलेच्या अंगावर कार घातली, अंगावर शहारे आणणारा व्हीडिओ