पिंपरी: वीस सापांच्या जीवांशी खेळणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात अॅनाकोंडा आणण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. त्यामुळे सापांचा जीव घेतल्यानंतर प्रशासनाला कोट्यवधी रुपये खर्चून आणलेल्या अॅनाकोंडाचाही जीव घ्यायचा आहे का? असा प्रश्न सर्प मित्रांकडून उपस्थित केला जात आहे.

काही वर्षांपूर्वी किंगकोब्रा गायब होणे, तसेच सापांच्या विषाची तस्करी आणि असे अनेक गैरप्रकार चालत असल्याचे आरोप पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयावर होत होते. त्यातच रविवारी या संग्राहायलयातील वीस सापांचा रविवारी  जीव गेला. हे प्रकरण ताजे आसतानाच आता प्राणी संग्रहालयामध्ये कोट्यवधी रुपये खर्चून अॅनाकोंडा आणण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचा हा अट्टाहास कशासाठी? असा प्रश्न सर्प मित्रांकडून उपस्थित केला जात आहे.

साध्या सापांचा जीव वाचवू न शकलेले वैद्यकीय अधिकारी अॅनाकोंडाचे संगोपनासाठी एक्सपर्ट आणणार असल्याचं सांगत आहेत. पण हे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे हे वक्तव्य 24 तासातच पालिका आयुक्तांनी खोडून काढले. यामुळं आयुक्त आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये मतमतांतर दिसून आलं.

दरम्यान, रविवारी जीव गमावलेल्या सापांपैकी अनेक सापांचा मृत्यू हवामान अनुकूल नसल्यानं झाल्याचं वैद्यकीय अधिकारी सांगतलं आहे. त्यामुळं अॅनाकोंडाला पिंपरी-चिंचवड शहरातील वातावरण पोषक राहील का? हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची मुळीच गरज भासणार नाही. मग वैद्यकीय अधिकारी हा अट्टाहास कुणासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे.