कुदळवाडीतील घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दोघा पादचारी तरुणांना दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून अडवलं. एकाचा मोबाईल हिसकावून घेतला, दुसरा तरुण मात्र मोबाईल द्यायला तयार नव्हता.
हा प्रकार सुरु असतानाच आणखी एका दुचाकीवर तिघे जण आले. त्या सर्वांनी तरुणाला बेदम चोप दिला आणि मोबाईल लुटला. चोरट्यांच्या हातात कोयते असल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे इतर नागरिकही मदतीला जायला धजावत नव्हते.
निगडी पोलिस सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत आहे. पण या टोळीमुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
पाहा सीसीटीव्ही फूटेज :