पिंपरी चिंचवड : डान्स बारमध्ये छमछम सुरु झाल्यानंतर पुण्यातील वडगाव मावळ पोलिस स्टेशनमध्ये एका बारबालेने तक्रार नोंदवली आहे. दोघा जणांनी बंदुकीच्या धाकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे.
पीडितेसह चौघींनी कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटका करुन घेतली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. शरद वीर असं आरोपीचं नाव आहे.
पनवेलच्या डान्सबारमधील या बारबाला काल पुण्यात आल्या होत्या. काही तरुणांनी एका बारबालेशी संपर्क साधून चौघींना घेऊन येण्याची मागणी केली. ठरल्याप्रमाणे आलेल्या चार बारबालांना घेऊन हे तरुण मावळ तालुक्यातील फळणे गावात गेले.
फार्महाऊसवरच छमछम सुरु झाली. डान्सचा आनंद घेत तरुणांनी दारुच्या बाटल्या रिचवल्या. के के उर्फ कैलास कुंजीर नावाच्या तरुणाने एका बारबालेला दारु पाजली आणि नंतर शरीरसुखाची मागणी केली. मात्र बारबालेने नकार देताच त्याने बंदुकीचा धाक दाखवला.
त्या चौघींनी कशीबशी तरुणांच्या तावडीतून सुटका करुन घेत फार्महाऊसवरुन पळ काढला. या तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरु करण्यापूर्वीच त्या गावातील मंदिरात लपून बसल्या. ग्रामस्थांनी हा प्रकार पाहून वडगाव मावळ पोलिसांनी कल्पना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बारबालांची सुटका केली.
बारबालांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत शरद वीरला बेड्या ठोकल्या, तर के के म्हणजेच कैलास कुंजीरचा शोध सुरु आहे. हे तरुण पिंपरी चिंचवड भागातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बंदुकीच्या धाकाने शरीरसुखाची मागणी, पुण्यात बारबालांच्या तक्रारीनंतर तरुणांवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Feb 2019 03:06 PM (IST)
मावळमध्ये के के उर्फ कैलास कुंजीर नावाच्या तरुणाने एका बारबालेला दारु पाजली आणि शरीरसुखाची मागणी केली. मात्र बारबालेने नकार देताच त्याने बंदुकीचा धाक दाखवला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -