पिंपरीत वाहन तोडफोडीचं सत्र सुरुच, थेरगावात 9 गाड्या फोडल्या
एबीपी माझा वेब टीम | 23 Jun 2016 02:26 AM (IST)
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. थेरगावातील पडवळनगरमध्ये नऊ वाहनांची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. सात ते आठ तरुणांनी गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती असून वाकड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. तलवार आणि दांडक्यांने 9 गाड्यांची या टवाळखोरांनी तोडफोड केली होती. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.