पुणे : इंदापूर तालुक्यातील अथुर्णे येथे शंभर मेंढ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून 70 मेंढ्या अत्यावस्थ आहेत. या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होत नसल्याने पशुवैद्य अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी मृत मेंढ्य़ा पुण्याला पाठवल्या आहेत.

 

बारामती रोडवरील गोतोंडी ते अंथुर्णेदरम्यान मेंढपाळ पाडुरंग गुरगुळे व शिवाजी नरुटे हे त्यांच्या ५०० मेंढ्या घेऊन बारामतीच्या दिशेने जात होते. यावेळी येथे अचानक त्यांच्या कळपातील मेंढ्या मृत पाऊ लागल्याचे या दोघा मेंढपाळांच्या निर्शनास आले. आजच्या एका दिवसात 50 मेंढ्या जागीच तडफडून मृत झाल्या तर 70 मेंढ्या या मृत्युशी झूंजत आहेत.

 

गेल्या तीन दिवसांत 100 हून अधिक मेंढ्या मृत पावल्याने मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे. मेंढ्याच्या कानातून पाणी येणे, डोळ्यातून रक्तस्त्राव होणे अशे गंभीर आजार त्यांना काहीवेळात होत आसून या मेंढ्या अक्षरशः तडफडून जागेवरच मृत पावत आहेत.

 

याची माहिती मिळताच सायंकाळी इंदापूर येथील पशुवैद्य अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली. अन मृत मेंढ्यांना शवविच्छेदनासाठी पुणे येथे पाठवण्यात आल्या.