पुणे : सोसायटीचा स्लाईड गेट अंगावर पडून पिंपरीत तीन वर्षांच्या एका चिमुरडीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. हातात बाहुली घेऊन खेळायला गेलेली ही चिमुरडी जागेवरच संपली. हृदय पिळवून टाकणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गिरीजा शिंदे (Pimpari Girija Shinde) असं या चिमुरडीचं नाव असून तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेहमीप्रमाणे ही तीन वर्षांची चिमुकली आपल्या मित्रांसोबत खेळायला गेली होती. खेळताना हातात बाहुली घेऊन ती पळत सुटली. तेवढ्यात तिच्यासोबत खेळत असलेल्या मुलाने सोसायटीचे स्लाइड होणारं गेट ओढलं. मात्र या गेटमध्ये बिघाड असल्याने ते गेट थेट गिरिजाच्या अंगावर पडल आणि गिरिजाचा खेळता खेळताच शेवट झाला. पिंपरी- चिंचवडच्या बोपखेल परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
हातात बाहुली घेऊन गिरीजा खेळत असताना अचानक तिच्या अंगावर गेट पडलं. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या मुलांनी शेजारच्यांना आवाज दिला. त्यावेळी आजूबाजूचे लोक पळत आले आणि तिला उचलून दवाखान्यात नेण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच गिरिजाचा मृत्यू झाला होता. घरातलं तीन वर्षाचं बाळ गेल्याने परिवारात शोककळा पसरली आहे.
ही बातमी वाचा: