पिंपरी चिंचवड : वाढदिवसाला तलवारीने केक कापणं बर्थडे बॉयसह त्याच्या मित्रांना चांगलंच महागात पडलं. पिंपरीत बर्थडे बॉय सुरज काटेसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू पिंपळे सौदागर भागात ही घटना उघडकीस आली आहे.

सुरज काटे या तरुणाचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस होता. बर्थडे साजरा करताना सुरजने तलवारीने केक कापला. विशेष म्हणजे या वाढदिवसाला भाजपचे आमदार महेश लांडगे आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे ही उपस्थित लावली होती.



वाढदिवसाचे फोटोही सुरजने फेसबुकवर टाकले. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अटकेतील आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.