पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये 21 वर्षीय विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विठ्ठल गडकर विद्यार्थ्यांचं नाव असून प्रेमप्रकरणातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.


विठ्ठलने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट ही लिहिली आहे. 'तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर बरं झालं असतं. माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरु नये. मी आयुष्याला कंटाळून हा निर्णय घेतला आहे.'

सुसाईड नोटमुळे प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याचा अंदाज दिघी पोलिसांनी व्यक्त केला आहे. पिंपरी चिंचवडच्या चऱ्होली गावात ही घटना घडली आहे.