पुण्याच्या भारती विद्यापीठातील मेडिकलच्या विद्यार्थिनीचा गळफास
एबीपी माझा वेब टीम | 20 Mar 2017 06:14 PM (IST)
पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठात शिकणाऱ्या मेडिकलच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियंका देवीदास भालेराव असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे. 26 वर्षांची प्रियंका भारती विद्यापीठातील आयुर्वेदिक महाविद्यालयात एमडीच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. सोमवारी तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मूळ परभणीची असलेली प्रियंका शिक्षणाच्या निमित्ताने भारती विद्यापीठातील पीजी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती. भारती विद्यापीठ पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.