पुणे : वर्ल्ड कपमध्ये आज भारत-बांगलादेश एकमेकांशी(World Cup 2023)  भिडणार आहेत. मैदानाप्रमाणेच गॅलरीत (MCA Stadium) फॅन्समध्ये युद्ध पाहायला मिळतं. असंच युद्ध आज भारताचा सायान कुमार आणि बांगलादेशचा दिवाण आरिफिन या दोन फॅन्समध्ये होणार आहे. कोलकातामध्ये एकाच कॉलेजमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारे हे मित्र आपापल्या देशाला चेअर करणार आहेत. मैदानात दोघे एकमेकांत भिडणार आहेत, विजय कोणाचा ही झाला तरी मॅचनंतर दोघे सोबतच पार्टी करून आनंद साजरा करणार आहेत. 


क्रिकेटचे सामने सुरु असताना प्रत्येक टीममध्ये मोठं युद्ध पाहायला मिळतं. त्यासोबतच चाहत्यांमध्येही हे युद्ध बघायला मिळत. चिडवाचिडवी आणि चिएरअप करत अनेक चाहते आपल्या टीमचं कौतुक करत असतात. मात्र हेच खेळाडू मैदानाबाहेर एकमेकांचे चांगले मित्रदेखील असतात. असेत हे भारताचा सायान कुमार आणि बांग्लादेशचा दिवाण आरिफिन हे आपल्या टीमचे चाहते आहे. दोघेही आपल्या टीमला चिअर करण्यासाठी  पुण्यात आले आहेत. महत्वाचं म्हणजे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असले तरीही क्रिकेटचा विषय समोर आला की एकमेकांच्या विरोधात भूमिका  घेत असतात.


आम्ही दोघंही कोलकातामध्ये एकाच कॉलेजमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत आहोत. आज 27 वर्षांनी पुण्यात सामने होत आहे आणि त्यातही भारत आणि बांगलादेश यांच्यात हा सामना रंगणार असल्याने दोघेही पुण्यात आलो आहे, असं बांगलादेश टीमचा चाहता  दिवाण आरिफिन सांगतो. 


भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होत असला तरीही दोघं आपल्या आपल्या देशांना चिअर करणार आहे. आमचाच देश जिंकणार, असा दावा दोघेही करत आहे. तर बांगलादेशची टीम चांगली आहे मात्र भारताचा विजय पक्का असल्याचं भारताचा क्रिकेट चाहता सायान कुमार सांगतो आणि कोहलीचं शतक हवं असल्याचंही तो सांगतो. 


आपल्या देशासाठी कोणी गद्दार होऊ शकत नाही असं म्हणत दोघंही आपल्या देशाच्या टीमचं कौतुक करत आहेत. मात्र 'बेटा कुछ भी बोले बाप, बाप होता है', म्हणत भारतीय चाहता आपल्या टीमचं कौतुक करत आहेत. 


मॅचनंतर एकत्र पार्टी करणार...


या सामन्यात अनेक खेळाडू उत्तम खेळणार आहे. दोन्ही टीम जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. दोन्ही टीमला चिअर करण्यासाठी चाहते जल्लोष करताना दिसत आहे. मात्र कोणताही संघ जिंकला तरीही आम्ही दोघं एकत्रच पार्टी करणार असल्याचं दोघं म्हणाले आहेत. 


इतर महत्वाची बातमी-


India vs Bangladesh Black Tickets : भारत-बांगलादेश मॅचच्या तिकिटांची ब्लॅकने विक्री, बाराशेचं तिकीट बारा हजारांना, दोघे अटकेत