पुणे : पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका  (Chandrapur And Pune By Poll Election) कधी जाहीर होणार? असा प्रश्न राज्याला पडला होता. मात्र पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. निधनानंतर पुढील निवडणुकीला एक वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ असेल तर निवडणुका घेणं निवडणूक आयोगाला अनिवार्य असतं मात्र काही अपवादात्मक परिस्थितीचं कारण पुढे करुन ही निवडणूक टाळली जाण्याची शक्यता आहे. 


पुणे लोकसभा मतदार संघाते भाजपचे गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघाने काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघाच्या जागा रिक्त होत्या. त्यानंतर काही महिन्यात दोन्ही मतदार संघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता होती. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल नसल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे या दोन्ही जागा येत्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.


गिरीश बापट यांचं 29 मार्च रोजी निधन तर बाळू धानोरकर यांचं 30 मे रोजी निधन झालं होतं. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपत आहे. मात्र तरी पोटनिवडणुकीची शक्यता नाही आहे. एक वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ शिल्लक असल्यास निवडणूक घेणं बंधनकारक असतं. 


नियम काय सांगतो?


लोकप्रतिनिधिच्या निधनानंतर  लोकसभेच्या कार्यकाळापेक्षा कमी कालावधी उरला असेल तर निवडणूक टाळता येते. 16 जून 2024 ला लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या 16 जून 2023 नंतर या लोकप्रतिनिधींचं निधन झालं असतं तर कार्यकाळाचं कारण देत या निवडणूका टाळता आल्या असत्या. मात्र या दोन्ही जागा एकवर्षापेक्षा जास्त काळ आधीच रिक्त झाल्या आहेत मात्र तरीसुद्धा या दोन्ही जागेसाठी लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही आहे. 


दोन कारणामुळे निवडणूक टाळता येते?


अपवादात्मक स्थिती आणि कार्यकाळ हे दोन कारणं निव़डणूक आयोग देऊ शकतात आणि पोटनिवडणूक टाळू शकतात. यातील एक कारण देत आता निवडणूक टाळण्यात येऊ शकते. 29 सप्टेंबरपर्यंत दोन्ही मतदार संघाच्या पोटनिवडणूक जाहीर होणं अपेक्षित होतं. निवडणूक आयोगाचा कार्यक्रम किमात 30 ते 35 दिवस आधी जाहीर होत असतो. मात्र हा कार्यक्रम अद्यापही जाहीर करण्यात आला नाही आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीची शक्यता संपुष्टात आल्याचं समोर येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Lok Sabha Election 2024 : मोदींचे 200 तर काँग्रेसचे कर्नाटकात 2000, निवडणुकीच्या वर्षात महिलांसाठी भेटीचा वर्षाव