पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा (Chandani Chawk Flyover) प्रश्न काही प्रमाणात जरी सुटला असेल तरी हा चांदणी चौकातील रस्ते वर्तुळाकार असल्याने भुलभुलैय्या सारखी स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता या भुलभुलैयाचा मनस्ताप होताना दिसत आहे. अनेक नागरिक या वर्तुळाकार रस्त्यामुळे रस्ता भरकटताना दिसत आहे. त्यामुळे आता महापालिका यावर तोडगा काढणार आहे. महापालिकेकडून नकाशे तायर करण्यात येणार आहे. पादचाऱ्यांसाठी अधिक सुविधाही निर्माण केल्या जाणार आहेत.
पादचाऱ्यांना या चौकातून सोयीचे व्हावे, यासाठी प्राधान्याने उपाय योजना केल्या जाणार आहेत. यामुळे नागरिकांना विशेषतः पादचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी कमी होतील, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. मात्र यापूर्वी याचा विचार करुन उपाययोजना महापालिकेने करायला हव्या होत्या, असं नागरिकांचं म्हणणं आहे. महापालिकेकडून चांदणी चौकात ठिकठिकाणी कोथरूड, मुळशी, बावधन, सातारा आणि मुंबईकडे कसे जायचे याचे नकाशे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच हे नकाशे तिथे लावण्यात येणार आहेत.
कोणता रस्ता, कुठे जातो हेच समजत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एक रस्ता जरी चुकला तरी वाहनचालकांना किमान दोन ते तीन किलोमीटरचा फेरा पडतो. यामुळे अनेक नागरिकांच्या वेळेचं नियोजन ढासळतं. परिणामी त्यांना पोहचायच्या ठिकाणी उशीर होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच नाराजी पसरल्याचं दिसत आहे. त्यामुळे महापालिका या नागरिकांसाठी नेमक्या कोणत्या सुविधा करते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कसा आहे चांदणी चौकातील पूल?
उड्डाणपुलाचा प्रकल्प तब्बल 397 कोटी रुपयांचा आहे. मुख्य महामार्गासह कोथरूड ते मुळशी, सातारा ते मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहतूक कोंडी टाळावी म्हणून येथे दोन सेवा रस्ते, आठ रॅम्प, दोन भुयारी मार्ग यासह17 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले.
पुणेकर वर्षभरापासून या पुलाचं काम पूर्ण होण्याची वाट बघत होते. वर्षभर या पुलाच्या कामामुळे पुणेकरांचा काहीसा त्रास सहन करावा लागला होता. अनेकदा वेगवेगळ्या मार्गावरची रस्ते बंद ठेवण्यात आली होती. काम लवकर पूर्ण व्हावं म्हणून रात्रंदिवस काम सुरु होतं. त्यानंतर हा पूल तयार करुन त्याचं धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आलं मात्र भुलभुलैया तयार झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Atul Benke : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके बनले राखीमॅन...