पुणे : नऊ वर्षापूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला युवक नक्षलवादी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा असे या तरुणाचे नाव आहे. छत्तीसगड येथील माओवादी संघटनेत तो सहभागी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
संतोष पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी भागात तो राहत होता. नोव्हेंबर 2010 मध्ये तो बेपत्ता झाला होता. याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ संदीप शेलार याने दिली होती. संतोष शेलार हा एका कबीर कला मंचच्या संपर्कात होता. तो स्वत: चित्रकार होता. 2010 साली तो पुण्यातून मुंबई येथे चित्रकला स्पर्धेसाठी गेला होता. त्यानंतर तो आजतागायत घरी परतला नाही.
2014 साली गडचिरोलीच्या जंगलात तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या शोधात होते. पण तो सापडत नव्हता. सोमवारी छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांची एक यादी जाहीर केली. त्यात संतोष शेलार हा नक्षलवादी कमांडर असल्याचो माहिती समोर आली आहे.
राजनांदगाव येथील तांडा एरिया कमिटीचा तो डेप्युटी कमांडर असल्याचे छत्तीसगड पोलिसांच्या यादीत म्हटले आहे. मात्र महाराष्ट्र पोलिसांना याविषयी छत्तीसगड पोलिसांकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नाही. माहिती मिळाल्यास पुढील तपास करू अशी माहिती खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी दिली आहे.
पुण्यातल्या कासेवाडी परिसरात शेलार कुटुंबीय राहते. या ठिकाणी त्याचा भाऊ, वडील राहतात. तो बेपत्ता झाल्यानंतर त्यानी खडक पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मात्र याला जबाबदार कबीर कला मंचाच्या कार्यकर्ते जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी शेलार कुटुंबीयांनी केली आहे.
नऊ वर्षापूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला युवक बनला छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jul 2019 03:14 PM (IST)
2014 साली गडचिरोलीच्या जंगलात तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या शोधात होते. पण तो सापडत नव्हता. सोमवारी छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांची एक यादी जाहीर केली. त्यात संतोष शेलार हा नक्षलवादी कमांडर असल्याचो माहिती समोर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -