मोशी, पुणे : शिरुर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) सातत्याने विरोधकांवर निशाणा साधताना दिसत आहे. शेककऱ्यांच्या प्रश्नावरुन तर कधी सरकारच्या धोरणावरुन त्यांच्यावर टीका करतात. केंद्रातील मोदी सरकार जाऊन नवीन सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला आहे. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नुकतीच मोशी येथे बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, देशामध्ये सर्वाधिक जागा काँगेस लढत आहे, देशातील वारं बदललं आहे. भाजप सरकारने महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दैना करून ठेवल्यामुळे देशातील जनता भाजपच्या सरकारवर नाराज आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे वारे वाहू लागले आहे. केंद्रातील मोदी सरकार जाऊन नवीन सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. असं म्हणत कोल्हे यांनी केंद्रातील सरकार बदलणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी या बहीण भावाकडे हा देश संघर्षाचे प्रतीक म्हणून बघत आहे. एकदा दिल्लीतील एक मोठे नेते सांगत होते की, काँग्रेस ही आजगरासारखी प्रचंड अवाढव्य आहे, पण ती सुस्त आहे असं वाटत राहतं, तसं आजगराकडे पाहिलं की वाटतं आजगर सुस्त आहे, पण तोच आजगर भुकेलेला असतो आणि त्याला भक्ष्य दिसतं तेव्हा आजगराऐवढी ताकद इतर कोणत्याही प्राण्यात नसते. अगदी तसं काँग्रेस असल्याचं आहे. असे यावेळी अमोल कोल्हे यांनी सांगितले.
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपले प्रश्न सुटणार नाहीत
देश पातळीवरची निवडणूक असली तरी विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत. म्हणून ते वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करत आहेत. विरोधी उमेदवार सुरवातीला म्हणाले, 2019 चा बदला घेण्यासाठी निवडणूक लढवायची, आता वारं बदललं हे लक्षात आल्यावर म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे. पण कोणाची पहिली निवडणूक असो किंवा शेवटची. त्याने आपले प्रश्न सुटणार नाहीत. महागाई कमी होणार नाही, की हाताला काम मिळणार नाही. याचाही विचार मतदारांनी करावा, असेही कोल्हे म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-
मी शेतकऱ्यांची मुलगी अन् बायको, शेतकऱ्यांची कळकळ चांगली समजते; सुनेत्रा पवार