जालना : जालना लोकसभा मतदारसंघातून (jalna Loksabha Constituency) सहाव्यांदा निवडणूक लढवत असलेल्या रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या कुटुंबाकडे स्थावर आणि जंगम अशी एकूण 42 कोटी मालमत्ता 59 लक्ष 82 हजार रुपयांची संपत्ती आहे.दानवे यांच्या उत्पनात मध्ये गेल्या पाच वर्षांत 26 लाख 52 हजार रूपयांची वाढ झाली असून त्यांच्या पत्नी निर्मला दानवेंच्या उत्पनात 6 लाख,24  हजार रूपयांची वाढ झाली  असल्याचे दानवे यांनी निवडणूक आयोगास दिलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.
  
रावसाहेब दानवे यांच्या कडे सध्या 24 कोटी 37 लाख रूपयांची स्थावर मालमत्ता असून 4 कोटी 51 लाख रूपयांची जंगम मालमत्ता असून 4 कोटी 2 लाखांचे  कर्ज दानवेंना आहे  त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्या नावे 12 कोटी 83 लाख 38 हजार रूपयांची स्थावर आणि 88 लाख 44 हजार रूपयांची जंगम मालमत्ता असून त्यांना 3 कोटी 46  लाख 33  हजार रूपयांचे कर्ज आहे. दानवे यांना वारसाहक्काने 93 लाख रूपयांची मालमत्ता मिळालेली असून निर्मला दानवेंना 3 कोटी 88 लाख 36 हजार रूपयांची मालमत्ता वारसा हक्काने मिळालेली आहे.                    


जिजामाता गृहनिर्माण संस्था,मुंबई यात 2 लाख 50  हजार रूपयांचे शेअर यासह रामेश्वर साखर कारखाना,सिध्देश्वर साखर कारखाना आणि स्थानिक सहकारी संस्थेत दानवे यांचे शेअर आहेत. रावसाहेब दानवेंच्या पोस्टात 6 कोटी 44 लाख विविध बँक आणि सहकारी पतसंस्थेत 2 कोटी 46 लाख 36 हजार रूपयांच्या ठेवी आहेत त्यांच्याजवळ 5 तोळे सोने आणि 4 किलो 700 ग्रॅम चांदी आहे निर्मला दानवेंजवळ 45 तोळे सोने आणि 2 किलो 700 ग्रॅम चांदी आहे. 18 लाख 24 हजार रूपयांचे पशूधन दानवेंजवळ आहे.


जालना लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्याकडे सुमारे 28 कोटी 88 लाख रुपयांची तर त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्याकडे 13 कोटी 71 लाख रुपये अशी एकूण दानवे दाम्पत्याकडे सुमारे 42 कोटी 60 लाख 30 हजार 652.15  रूपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. शेती, खासदार पदाचे वेतन, भाडे हे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहेत.


दानवे यांच्याकडे शेतजमीन


दानवे आणि त्यांच्या पत्नींच्या नावे जवखेडा बु.आणि खु.,भोकरदन,राजूर,नळणी,जालना,जळगाव सपकाळ,विझोरा,धावडा,पद्मावती,तपोवन या ठिकाणी सुमारे 70 एकर शेतजमीन आहे निर्मला दानवेंच्या नावे जवखेडा,कोठा दाभाडी आणि सिल्लोड येथे 25 एकर शेतजमीन आहे यासह भोकरदन,राजूर,जाफराबाद,जालना व जवखेडा येथे घर आणि माहोरा जळगाव सपकाळ,उरसोनी ता.भिवंडी जि.ठाणे ,भोकरदन आणि जालन्यात व्यवसायिक मालमत्ता आहेत.


सोनं-चांदीत वाढ नाही


2019 रावसाहेब च्या शपथपत्रानुसार यांच्याकडे 4 किलो 700  ग्राम चांदी आणि 5 तोळे सोने होते. तर निर्मला दानवे यांच्याकडे 45 तोळे सोने आणि 2 किलो 700 ग्राम चांदी होती. तर 2024 च्या शपथपत्रात सोनं-चांदीच्या दागिन्यांमध्ये किंचितही वाढ झालेली दिसून येत नाही.


दानवेंकडे कार नाही, मात्र साडेआठरा लाखांचं पशुधन


दानवेंच्या आणि त्यांच्या पत्नींच्या  नावावर एकही कार, गाडी नाही.मात्र रावसाहेब दानवे यांच्याकडे 18 लाख 24 हजार रूपयांचे पशूधन असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपतपत्रात नमूद केलं आहे


दानवेंवर सात कोटींचं कर्ज


2019 मध्ये रावसाहेब दानवे यांच्याकडे एक रूपयांचेही कर्ज नव्हते. परंतु, 2914 च्या शपथपत्रानुसार 4 कोटी 2 लाख 44 हजार 81 रूपयांचे कर्ज आहे. तर निर्मला दानवे यांच्याकडे 2019 मध्ये असलेले 24 लाख रुपयांचे कर्ज 2014  मध्ये 3 कोटी 46 लाख 33 हजार 237 रूपयांवर गेले आहे. दानवे दाम्पत्यांकडे एकूण कर्ज 7 कोटी 48 लाख  77 हजार ३१८ रूपयांवर गेल्याचे शपथपत्रात नमूद आहे.


इतर महत्वाची बातमी-


Raj Thackeray: भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याच्या मोबदल्यात राज ठाकरेंना काय मिळणार? भाजपचा बडा नेता म्हणाला...