Ajit Pawar : एकनाथ शिंदेंचं (CM Eknath Shinde) काय चाललंय याचा विचार करु नका, रानात लक्ष द्या, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार फटकेबाजी केली. अजित पवारांचे उपमुख्यमंत्री पद गेलं, आता त्याच काय सुरु असेल, असा विचार करत बसू नका. अजित पवार तेव्हा पण काम करत होता आता पण काम करतोय असेही ते म्हणाले. सध्या लोकशाहीचा खेळ खंडोबा चालला आहे. अधिकाऱ्यांना कळेना नेमकं ऐकायचं कोणाचं. यातून विकासावर परिणाम होत असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.


यंदा अनेक कारखान्यांनी विस्तार वाढ केलीय, त्यामुळं पहिल्या दिवसापासून ऊसाचं गाळप वाढणार


बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 61 वा गळीत हंगामाचा शुभारंभ मोळी पूजन करून  अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ऊसाच्या मोळीचं पूजन करुन गव्हाण पूजन करण्यात आली. त्यानंतर शेतकरी मेळाव्याला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हजेरी लावली. या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी शेतकऱ्यांना संबोधित केलं. येत्या 15 तारखेपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरू होईल. आधी कारखाना सुरु करावा अशी मागणी होती, परंतू, रिकव्हरी कमी बसते. मागच्या वर्षी ऊसाचा गळीत हंगाम लांबला. परंतू, यंदा अनेक कारखान्यांनी विस्तार वाढ केली आहे. त्यामुळं पहिल्या दिवसापासून ऊसाचे गाळप वाढणार असल्याचे अजित पवार म्हणाले.


बाणगंगा साखर कारखान्याने 2 हजार 450 दर दिला, तर लोकांनी डोक्यावर घेतलं.


दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने कलकत्ता मार्केट काबीज केलं आहे. त्याचा फटका आपल्याला बसणार आहे. त्यावर मी सरकारला सांगितले की पीयूष गोयल यांना भेटा. आपण कलकत्ता बंदर आपल्याला घ्या, नाहीतर एका साखरेच्या पोत्याला दीडशे रुपये जास्त मोजावे लागतील असे अजित पवार यावेळी म्हणाले. उस्मानाबादमध्ये गेलो होतो, तिकडे 2 हजार 200 रुपये म्हणजे फार भाव झाला. यंदा आम्ही बिराजदार आणि बाणगंगा साखर कारखान्याने 2 हजार 450 दर दिला, तर लोकांनी डोक्यावर घेतले. इथं 3 हजार दर दिला तरी एक टाळी वाजत नाही. तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मी काही बोलणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Ajit Pawar : चंद्रकांत पाटलाचं आई-वडिलासंदर्भातलं वक्तव्य म्हणजे 'विनाशकाले विपरीत बुद्धी'; अजित पवारांची टीका