Chetan Tupe : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटातील) काही नेते, आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) आणि शरद पवार (Sharad Pawar) एकाच मंचावर आले होते. त्यामुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावरती चेतन तुपे (Chetan Tupe) यांनी भाष्य केलं आहे. पुण्यात सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने ‘गोल्डन जुलै’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवारांसह (Sharad Pawar) माजी खासदार श्रीनिवास पाटील देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) हे देखील उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना चेतन तुपे (Chetan Tupe) म्हणाले, ‘गोल्डन जुलै’ हा कार्यक्रम राजकीय नव्हता. त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून मी या कार्यक्रमात उपस्थित होतो. राजकीय कार्यक्रम नसल्याने मी उपस्थित राहिलो. यावेळी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) कोणतीही चर्चा झाली नाही. सातारा जिल्हा मित्रमंडळाचा स्नेहमेळावा असल्याने मी आलो. याच कार्यक्रमाच्या अध्यक्षाने एमएलए निमंत्रण दिलं होतं. मी हडपसरचा आमदार आहे. या वनवडी परिसरात हा कार्यक्रम असल्याने मी हजर होतो, असं चेतन तुपे (Chetan Tupe) म्हणाले.
हा कार्यक्रम राजकीय नव्हता. त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून मी या कार्यक्रमात उपस्थित होतो. राजकीय कार्यक्रम नसल्याने मी उपस्थित राहिलो आहे. शरद पवारांसोबत (Sharad Pawar) कोणतीही चर्चा झाली नाही. सातारा जिल्हा मित्रमंडळाचा स्नेहमेळावा असल्याने मी आलो. याच कार्यक्रमाच्या अध्यक्षाने निमंत्रण दिलं होतं. मी हडपसरचा आमदार आहे. हा वनवडी परिसर पुणे कैंटोनमेंट मध्ये येतो असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि चेतन तुपे पहिल्यांदाच एका मंचावर
राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि चेतन तुपे (Chetan Tupe) पहिल्यांदाच एका मंचावर दिसून आले. सातारा जिल्हा मित्र मंडळाच्यावतीने आयोजित ‘गोल्डन जुलै’ कार्यक्रमात हे दोन नेते एका मंचावर होते. हा कार्यक्रम हडपसर मतदार संघातील वानवडीत पार पडला. शरद पवार आणि चेतन तुपे एका मंचावर आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. त्याचबरोबर माजी खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील देखील उपस्थित होते.