Sharad Pawar: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच अजित पवार गटाचे हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे हे आज शरद पवारांसोबत (Sharad Pawar) एकाच व्यासपिठावर दिसून आले आहेत. शरद पवारांच्या (Sharad Pawar) एका कार्यक्रमाला तुपेंनी हजेरी लावली आहे.
शरद पवाराच्या या कार्यकमाला चेतन तुपे (Chetan Tupe) यांनी देखील हजेरी लावली आहे. सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने गोल्डन जुलै कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम हडपसर मतदार संघातील वानवडी येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवारांसह माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी देखील हजेरी लावली आहे. यांच्यासोबत हडपसरचे अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांची हजेरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
बाबाजानी दुर्राणी यांनी असून शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश
परभणीतील (Parbhani News) पाथरी मतदारसंघात (Pathari Constituency) अनेक परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar Group) गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) शरद पवार गटात (Sharad Pawar Group) जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
"शरद पवार साहेबांना सोडून गेलेले अनेक पाहिले, ते पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत. ते शून्य झाले, बरं झालो मी शून्य होण्याआधी परत आलो", असे विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी (Babajani Durrani) म्हणाले. बाबाजानी दुर्रानी यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत दुर्रानी यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी घनसावंगीचे आमदार राजेश टोपेही (Rajesh Tope) उपस्थित होते.
शरद पवार यांच्याकडे आज मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षने पाहात आहे - दुर्रानी
बाबाजानी दुर्रानी म्हणाले, 10 वर्षात देशात जातीवाद पसरवला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे आज मुस्लिम समाज मोठ्या अपेक्षने पाहात आहे. जोपर्यंत देशात परिवर्तन होत नाही, तोपर्यंत आपणास दीर्घायुष्य मिळावे. मला देखील खंत वाटते मी साहेबांना का सोडले? लोकसभा निवडणूक लोकांनी भाजपविरोधात हातात घेतली होती. शरद पवारांच्या (Sharad Pawar) नेतृत्वाखाली राज्यात सत्तापरिवर्तन होणार आहे. आम्ही कुठेही असलो तरीही आतून शरद पवार यांच्यासोबत होतो आणि त्यांना मदत देखील केली. मुस्लिम समजाचे उलमा यांचा दबाव होता की शरद पवार गटासोबत राहायला पाहिजे.