Panshet Dam: पुणे शहर परिसरात गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसामुळे शहर (Pune Rain Update) परिसरातील धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी पानशेत (Panshet Dam) व वरसगाव धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे काल (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणात 1.36 टीएमसी (68.77 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता. तसेच धरणसाखळीत पाच वाजेपर्यंत 24. 07 टीएमसी म्हणजे 82.58 टक्के इतका साठा झाला होता. पानशेत धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असून, या धरणात 92.68 टक्के जलसाठा झाला आहे.


पानशेत धरण (Panshet Dam) पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. पानशेत धरण जलाशय आज (28 जुलै) सकाळी 5:00 वाजता 94% टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येणारे पाणी वाढत गेल्यास कधी ही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी धरण परिसरात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, त्याचबरोबर नारगिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 


पाणशेत धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर


गेल्या 24 तासांमध्ये धरणसाखळीत 1.45 टीएमसीची पाण्याची भर पडली आहे. खडकवासला धरणात शुक्रवारी सायंकाळी 1.03 टीएमसी म्हणजे (51.99 टक्के) पाणी होते. पाण्याची आवक वाढल्याने खडकवासला पुन्हा शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. मुठा नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. खडकवासला धरण माथ्यावर पावसाचा (Heavy Rain Update) जोर ओसरला आहे. मात्र, पानशेत आणि वरसगाव धरण क्षेत्रातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील डोंगरी पट्ट्यात शुक्रवारी संततधार पाऊस झाल्याने शनिवारी पावण्याची आवक वाढली आहे.


पुण्यात पुन्हा पावसाला सुरूवात


पुणे शहर (Pune Rain Update) परिसरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आज(रविवारी) पहाटेच्या सुमारास काही भागात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पुण्यासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पुणे शहराला (Pune Rain Update) येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार



खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. दुपारी तीन वाजता पाच हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने पाण्याचा विसर्ग होणार आहे.