Mumbai Pune Express Way Accident :  राज्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गावर बसचा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. हे तीनही जण बोरघाटात सुरू असलेल्या कामावरील मजूर आहेत. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर खासगी बसने सिमेंट मिलरला जोरदार धडक दिली. खासगी बस चालक गंभीर जखमी झाला असून 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर, बार्शी-कुर्डुवाडी रोडवर ट्रॅक्टर आणि खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर 10 जखमी झाले. 


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. बोरघाटात रस्त्याचे काम सुरू आहे. अपघातात या ठिकाणी काम करणाऱ्या तीन मजुरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. खासगी बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर, 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.  या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर काही वेळेसाठी वाहतूक कोंडी झाली होती. बार्शी-कुर्डुवाडी रोडवर ट्रॅक्टर आणि खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर 10 जखमी झाले. बार्शी-कुर्डुवाडी रोडवर तिरकस पुलाजवळ ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा अपघात झाला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 


दरम्यान, या अपघाताच्या एक दिवस आधीदेखील बोरघाटात अपघात झाला होता. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका पिकअप वाहनाचा अपघात झाला होता. पिकअप वाहनाने क्रॅश बॅरियरला धडक दिली. या धडकेनंतर पिकअप वाहन उलटले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकजण जखमी झाला.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha