पुणे : '19 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या' (19th Pune International Film Festival) समारोप समारंभात विविध श्रेणींमध्ये निवडलेल्या चित्रपटांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शकाचा ‘प्रभात’ पुरस्कार गौरव मदन यांना ‘बारा बाय बारा' (12×12) या चित्रपटासाठी, तर महाराष्ट्र शासनाचा ‘संत तुकाराम’ हा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार  'पोरगा मजेत' (हॅपी माय सन) ला प्रदान करण्यात आला. 


त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाअंतर्गत मराठी गटात 'गोदाकाठ'साठी गजेंद्र अहिरे आणि 'तक तक'साठी विशाल कुदळे यांना ज्युरी विशेष , तर उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार रमेश दिघे यांना 'FUN ERAL' चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.  सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा पुरस्कार सुरेश देशमाने यांना 'काळोखाच्या पारंब्या' या चित्रपटासाठी, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार विवेक दुबे यांना 'FUN ERAL' चित्रपटासाठी देण्यात आला. हा 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवासाठी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. 


सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेत्याचा पुरस्कार शशांक शेंडे यांना ‘पोरगा मजेत’ या चित्रपटासाठी, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘जून’ चित्रपटासाठी नेहा पेंडसे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी '20 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची' तारीख ही जाहीर करण्यात आली.  19 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा 3 मार्च 2022 ते 10 मार्च 2022 दरम्यान पार पडणार आहे. 


संबंधित बातम्या :