भाजपकडून औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांना तिसरी उमेदवारी जाहीर झाली आहे. याआधी रामदास आठवले आणि उदयनराजेंची नावं घोषित झाली होती. दरम्यान, एकनाथ खडसेंची राज्यसभेवर वर्णी लागावी, यासाठी राज्यातील भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरु होते. पण त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. याशिवाय संजय काकडे यांनाही पुन्हा संधी मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे सांगितले.
दिग्गजांना बाजूला सारत राजीव सातव राज्यसभेवर, राहुल गांधींच्या विश्वासामुळे 45 व्या वर्षी राज्यसभेत
म्हणून मला संधी दिली नाही : संजय काकडे
रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले हे दोघंही भाजपमध्ये बाहेरुन आले आहेत. मी ही बाहेरून आलोय. त्यामुळे तीघेही उमेदवार बाहेरचे नकोत म्हणून कदाचित पक्षाने उमेदवारी नाकारली असावी, असा दावा संजय काकडे यांनी केला आहे. यावेळी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी उमेदवारी दिली नसल्याने दुःख झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, खडसेंना राज्यात काहीतरी पद मिळेल. तसा त्यांना शब्द दिला असेल, असेही ते म्हणाले. माझी राज्यसभेची मुदत संपली, की मी भाजपचे सदस्यत्व घेईन, असे सांगत पक्ष मलाही कुठेतरी संधी देईल, अशी आशा काकडेंनी व्यक्त केलीय. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोघेही माझे मित्र असल्याचं सांगत एकप्रकारे मला दारे खुली असल्याचा इशारा, काकडेंनी दिल्याचं बोललं जात आहे.
स्मशानात जाईपर्यंत शिवसैनिकच राहील; राज्यसभेसाठी संधी न मिळाल्यानं चंद्रकांत खैरे यांची खदखद
शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, तर काँग्रेसकडून राजीव सातव यांना संधी
राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार अखेर ठरला आहे. रावते, खैरे यांची नावं चर्चेत असतानाच शिवसेनेनं प्रियंका चतुर्वेदींसारख्या उमद्या आणि युवा नेत्यांमधील प्रसिद्ध चेहऱ्याला संधी दिली आहे. तर, काँग्रेसनं राजीव सातव यांचं नाव घोषित केलंय. मात्र, महाविकासआघाडीच्या चौथ्या जागेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. ही जागा कुठल्या पक्षाकडे जाते. हे पाहणं आता महत्वाचं असेल.
Rajya Sabha Election | राज्यसभेसाठी भाजपकडून उदयनराजे आणि रामदास आठवलेंचा उमेदवारी अर्ज