राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार अखेर ठरला आहे. दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे यांची नावं चर्चेत असतानाच शिवसेनेनं प्रियंका चतुर्वेदींसारख्या उमद्या आणि युवा नेत्यांमधील प्रसिद्ध चेहऱ्याला संधी दिली आहे. तर, तिकडे भाजपकडून औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांना तिसरी उमेदवारी जाहीर झाली आहे. याआधी रामदास आठवले आणि उदयनराजेंची नावं घोषित झाली होती. दरम्यान, एकनाथ खडसेंची राज्यसभेवर वर्णी लागावी, यासाठी राज्यातील भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. पण त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. याशिवाय संजय काकडे यांनाही पुन्हा संधी मिळाली नाही. तर काँग्रेसनं राजीव सातव यांचं नाव घोषित केलंय. मात्र, महाविकासआघाडीच्या चौथ्या जागेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. ही जागा कुठल्या पक्षाकडे जाते. हे पाहणं आता महत्वाचं असेल.
दिग्गजांना बाजूला सारत राजीव सातव राज्यसभेवर, राहुल गांधींच्या विश्वासामुळे 45 व्या वर्षी राज्यसभेत
मला अनेक ऑफर होत्या पण शिवसेना सोडली नाही
शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यावरही खैरे यांनी निशाणा साधला आहे. आता ती बाई खूप चांगलं काम करेल. हिंदी बोलते इंग्रजी बोलते हरकत नाही. पण, मी वीस वर्षे लोक सभा गाजवली. मी इकडे तिकडे कधी गेलो नाही. मला अनेक ऑफर होत्या. मरेपर्यंत शिवसैनिक राहील. बाकीचे येतात आणि जातात. कितीजण कितीजण गेले. लोकांच्या सेवेसाठी आघाडीसोबत गेले, अशी खदखद खैरे यांनी व्यक्त केलीय. आता बोलावल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोरला आणलं. मात्र, तरीही हव्या तितक्या जागा शिवसेनेला मिळवता आल्या नाही. उद्धव ठाकरे यांनी एकटे असताना 67 जागा आणल्याची आठवण करुन देत पक्षात जुने लोक महत्वाची असल्याचं अधोरेखीत केलं.
Rajya Sabha Election | शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी घोषित