पुणे: मागील काही दिवसांमध्ये अगदी क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मोबाईलचं हॉटस्पॉट देण्यावरून असो किंवा हॉटेल बंद झाल्यावर जेवण देण्यास दिलेला नकार असो, अशा अगदी छोट्या-छोट्या कारणांवरून जीव घेण्याच्या हल्ले करण्याच्या घटनांनी शहर हादरलं आहे, असं असतानाच प्रेयसीच्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलाने उलटी केल्याच्या रागातून त्याला बेदम मारहाण (Pune Crime News) करून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत त्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


नेमकं काय घडलं?


प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाने उलटी केल्याने रागातून प्रियकराने मुलाला बेदम मारहाण (Pune Crime News) केली. बेदम मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.


महेश कुंभार (रा. पंचवटी नाशिक) असं आरोपीचे नाव आहे. तर वेदांश काळे (वय 4 वर्षे, रा. बिबवेवाडी, पुणे) असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. 1 सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर वेदांशने अचानक उलटी केली. त्यानंतर आरोपी महेश कुंभार चिडला. त्याने मुलाला हाताने आणि झाडूने बेदम मारहाण (Pune Crime News) केली. या घटनेत वेदांश बेशुध्द झाला, त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, उपचारांदरम्यान वेदांशचा मृत्यू झाला. 


आपला चार वर्षाचा मुलगा वेदांश खाटेवरून खाली पडल्याने बेशुद्ध झाल्याचा बनाव (Pune Crime News) करत त्याची आई पल्लवीने मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयात त्याला उपचारांसाठी दाखल केले होते. शवविच्छेदन अहवालात वेदांशचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केले, त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. तपासामध्ये पल्लवी तीन महिन्यांपासून बिबवेवाडीत राहत होती. तिचे नाशिकमधील महेश कुंभार याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. 


शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांचा सखोल तपास


बेशुद्ध पडल्याचा बनाव करून त्याला मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी (दि. 2) त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात चिमुकल्या वेदांशचा मृत्यू बेदम मारहाण (Pune Crime News) केल्यामुळे झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केले होते. त्यानंतर बिबवेवाडी ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोढवे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, उपनिरीक्षक शशांक जाधव, विजय लाड, अंकुश कॅगले, नितीन धोत्रे, आदिती बहिरट यांनी वेदाशंची आई पल्लवी हीच्याकडे सखोल चौकशी केली. या चौकशीत पल्लवी तीन महिन्यांपासून बिबवेवाडीत राहत होती आणि तिचे नाशिकमधील महेश कुंभार याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले.


पल्लवी आपल्या मुलाला घेऊन आरोपी महेशच्या घरी गेली होती. 1 सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर वेदांशने उलटी केल्याने महेश चिडला. त्याने वेदांशला झाडूने मारहाण केली. तो बेशुध्द झाल्यावर त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केलं मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी महेशला अटक केली आहे.