पुणे : अजित पवार गटाचे (Ajit Pawar) आमदार सुनिल शेळकेंनी (Sunil Shelke) आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहे. रोहित पवार हे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणतात दुसरीकडे महाराष्ट्राच दैवत खंडोबा येथे मटणाच्या दोन हजार टन गाड्या खाली केल्या, मटण, दारू, मतांना दोन हजार वाटले, असं म्हणत त्यांनी रोहित पवारांचा समाचार घेतला आहे. रोहित पवारांनी भोरमध्ये पैसे वाटत असल्याचे काही व्हिडीओ ट्विट केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना सुनिल शेळकेंनी हे आरोप केले आहेत. 


ते म्हणाले की,  बारामतीच्या युवराज यांना सांगायच आहे. निवडणूक ही लोकशाहीच्या मार्गाने झाली पाहिजे. त्यांनी नोकरी आणि व्यवसायातील बांधवांना देखील प्रचारात उतरवलं तरीही आम्ही आक्षेप घेतला नाही. भोर, वेल्ला येथे गाडीत पैसे टाकून अर्धवट व्हिडिओ बनवले. हे बघता त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. पराभव दिसत आहेत, भोरमधील स्थानिक गुंडांना हाताशी धरून भोर अध्यक्ष, युवक अध्यक्ष यांना घरात घुसून मारहाण केली. याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल. याबाबत पोलिसांनी सत्यता तपासावी, अशी मागणीदेखील सुनिल शेळकेंनी केली आहे. 


रोहित पवार हे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी..म्हणतायत, दुसरीकडे महाराष्ट्राच दैवत खंडोबा येथे मटणाच्या दोन हजार टन गाड्या खाली केल्या, मटण, दारू, मतांना दोन हजार वाटले. त्यामुळे तुम्ही आम्हाला राजकारण आणि स्वाभिमान शिकवण्याची आवश्यकता नाही, असाही हल्लाबोल सुनिल शेळकेंनी रोहित पवारांनी केला आहे. 


त्यासोबतच रोहित पवार मागील काही दिवसांपासून अजित पवारांवर रोखठोक आरोप करत आहेत. टीका करताना दिसत आहे. त्यात सुप्रिया सुळेंसाठी आयोजित करण्यात आलेल्या सांगता सभेत रोहित पवार भावूक झाले. त्यानंतर अजित पवारांनी त्यांनी मिमिक्रीदेखील केली. त्यानंतर सुनिल शेळकेंनी रोहित पवारांवर टीका केली आहे.  रोहित पवारांची नौटंकी सुरू आहे. नौटंकी करून राजकारण करू नका. त्यांनी स्वतः च कर्तृत्व दाखवून मोठं व्हावं. अजित पवारांना व्हिलन करून रोहित पवार मोठे होणार नाहीत. बारामतीचा निकालावर बरंच काही स्पष्ट होईल, असंदेखील त्यांनी सांगितलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या