पुणे: आगामी विधानसभेच्या अनुषंगाने नेत्यांच्या पक्षबदल आणि भेटीगाठी या घडामोडी राज्याच्या राजकारणात वाढल्या आहेत. अशातच आज राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्याचबरोबर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांमध्ये (Harshvardhan Patil) बैठक पार पडली. शरद पवार यांची वसंत दादा शुगर इन्स्टिट्युटमधली बैठक संपल्यानंतर पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये (Harshvardhan Patil) बैठक झाली. या बैठकीनंतर ते शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे, या बैठकीत नेमकं काय घडलं याबाबतची उत्सुकता नेत्यांना लागली आहे. 


बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?


या बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) म्हणाले, आज बैठकीमध्ये संस्थेच्या संदर्भातील चर्चा झाली. राज्यात अनेक ठिकाणी साखर कारखारण्यासंदर्भात जागेसंदर्भात चर्चा झाली. शरद पवार गटात प्रवेश करण्यासंदर्भात कोणती चर्चा झाली नाही असं हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) म्हटलं आहे. 


तीन आठवड्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. ते निर्णय घेतील ते पाहावं लागेल. आम्ही लोकांच्यात असतो. कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महायुतीच्या जागावाटपात अंतिम निर्णय झाला नाही. त्या कमिटीत मी नाही. मी कोअर कमिटीत आहे. त्यात तरी जागावाटपाबाबत चर्चा झाली नाही. महायुतीच्या संदर्भातील निर्णय फक्त भाजप घेणार नाही. राहिला प्रश्न इंदापूरचा तर कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. हे पाहून वरिष्ठ निर्णय घेतील.महायुतीत जागावाटपाचा निर्णय झालेला नाही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.कार्यकर्ते म्हणत आहेत की आपल्याला महायुतीच तिकीटच मिळालं पाहिजे. काही म्हणतात अपक्ष उभे राहा मात्र ही कार्यकर्त्यांची चर्चा आहे याबाबत कोणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही, असं हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) म्हणाले आहेत.


हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर बावनकुळेंचं मोठं विधान


"त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाहीत. मात्र, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल, महायुतीमध्ये ज्या विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे जातील, त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीत लढलेले आमचे नेते आहेत. मात्र, त्यांना थांबायचं नाही. शेवटी त्यांनी थांबावं, अशी आमची इच्छा आहे, आमची त्यांना विनंती आहे. मात्र, शेवटी त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाहीत. आता महाविकास आघाडीचे अनेक नेते आहेत की, ते तिकडून आमच्याकडे येणार आहेत. मग याचा अर्थ असा नाही की त्यांना तिकीट मिळेल. माझं असं म्हणणं आहे की, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं, त्यावर आज हर्षवर्धन पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


बावनकुळेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले पाटील?


चंद्रशेखर बावनकुळे हे ज्येष्ठ नेते आहेत. ते काय बोलले मला माहीत नाही. मी कोणाला भेटलो आणि बोललो नाही. अजित पवारांच्या दौऱ्यात अश्या चर्चा दिसत आहे, की सीटिंग आमदारांना जागा देतील, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) दिली आहे.


संबधित बातमी - Harshvardhan Patil: काल तुतारी हाती घेण्याची चर्चा, आज हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांची भेट, पुण्यात राजकीय घडामोडींना वेग


 


VIDEO - Harshwardhan Patil Meet Sharad Pawar : हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येणार?