मावळ, पुणे : मावळ लोकसभेचा तिढा (Maval Loksabha Election 2024) कायम आहे. त्यातच मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी आज (16 मार्च) मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्याची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत चर्चा केली आहे. यावेळी यंदा महायुतीची उमेदवारी मला मिळणार असल्याचा दावा श्रीरंग बारणेंनी केला आहे. त्यासोबतच महायुतीतील मित्रपक्षांनी एकमेकांना मदत करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बारणे म्हणाले की, राजकारणात प्रत्येकाला प्रत्येक मतदार संघात सहकार्य आणणि सहयोग पाहिजे. त्यासोबतच पाठिंबादेखील पाहिजे. त्यात दृष्टीकोनातून महायुतीतील घटक पक्ष सगळे एकत्रपणे काम करतील. आतापर्यंत महायुतीचा उमेदवार म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणुका लढवल्या आहेत आणि काम केलं आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचा माध्यमातून निवडणूक लढली होती आणि आतादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आतापर्यंत कमळावर लढणार की धनुष्यबाणावर लढणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर यासंदर्भात वरिष्ठांचीदेखील चर्चा झाल्याचं बोललं गेलं. मात्र 'मी महायुतीचा उमेदवार असेल' असं म्हणत बारणेंनी संदिग्धता कायम ठेवली होती. बारणेंच्या उमेदवारीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि भाजपने ही विरोध दर्शविला होता. पिंपरी भाजपने कमळावरचा उमेदवार असायला हवा, मग बारणे असले तरी आमची हरकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यालाच अनुषंगाने बारणे भाजपचे उमेदवार असतील, अशी चर्चा मावळ लोकसभेत सुरू होती. अशातच मी महायुतीचा उमेदवार असेन, असं म्हणत बारणेंनी आणखी संदिग्धता वाढवली होती.
त्यात आता निवडणुकीच्या तारखादेखील जाहीर होतील. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची बारणेंनी भेट घेतली. या बैठकित त्यांच्यात कोणत्या चर्चा झाल्या यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र त्यांनी मावळचा महायुतीचा उमेदवार मीच असेल, असं पुन्हा एकदा सांगितलं आहे.
भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा बारणेंना विरोध
मावळ लोकसभेच्या उमेदवारीसाठी खासदार श्रीरंग बारणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला मुंबईत पोहचलेत. दुसरीकडे मतदारसंघात मात्र भाजप एकवटली आहे. आम्ही दोनवेळा बारणेंसाठी झटलो, पण आता आम्हाला बारणे उमेदवार नकोत. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनाचं उमेदवारी द्या, असं मत व्यक्त केलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune MNS : कात्रज मनसेचा बालेकिल्ला आहे, होता आणि राहिल; मनसेच्या बॅनरची जोरदार चर्चा