मावळ, पुणे : मावळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा रोडशो पार पडला यावेळी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री यांनी निशाणा साधलाय. शरद पवारांनी हडपसरच्या सभेत बोलताना इंग्रजांना लोकांनी हद्दपार केलं तर मोदी (Narendra Modi) काय चीज आहे, असा सवाल विचारला तर दुसरीकडे मोदींच्या आजपर्यंतच्या राजकारणावर टीका केली त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं मात्र 10 वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये इंग्रजांनाही मागे टाकणारे आपले मोदी आहे, असं सडेतोड उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. 


मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?


एकनाथ शिंदे म्हणाले, इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं मात्र 10 वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये इंग्रजांनाही मागे टाकणारे आपले मोदी आहे. त्यांना रोखठेक उत्तरं देणारे आपले मोदी आहेत. पाकिस्तानला धडा शिकवणारे आहेत. आपल्या सैनिकांचे मुंडके छाटून पाकिस्तानची हिंमत दहशतवादी करत होते. आता तशी हिंमत कोणाची होत नाही. आता मजबूर भारत नाही तर मजबूत भारत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना टोला लगावला. 


विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली!


देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर राहुल गांधी आहेत. एकीकडे देशभक्त तर दुसरीकडे देशद्रोह दिसत आहे. कारण पाकिस्तानची बोली आता बोलू लागली आहे. निवडणुकांमध्ये पराभव होणार आहे त्यामुळे त्यांच्या पाय़ाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे विकासाचे मुद्दे मागे ठेवून नवे मुद्दे आणत आहेत. मात्र जनतेने ठरवलं आहे की फिर एक बार मोदी सरकार आणि फिर एक बार श्रीरंग बारणे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


पुण्यात सभांचा धडाका


चौथ्या टप्प्यासाठी येत्या 13 तारखेला मतदान होतंय आज प्रचाराच्या तोफा थंड होत आहेत मावळ पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत आहे महा युतीचे तसेच महाविकास आघाडीचे अनेक नेते पुण्यामध्ये प्रचारांचा प्रचारासाठी आले आहेत देवेंद्र फडणवीस दिवसभर पुण्यात तळ ठोकून आहेत तर दुसरीकडे शरद पवारांची अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ हडपसरमध्ये सभा पार पडली यावेळी त्यांनी मोदींवरती टीका केली तसेच चेतन तुपे हे अजित पवारांसोबत गेले ना त्यांच्यावर देखील नाव न घेता निशाणा साधला  आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Maharashtra Weather Update :  पुणे, साताऱ्यात ऑरेंज अलर्ट; पुढील चार दिवस राज्यातलं हवामान कसं असेल?