पुणे : दारू आणि सिगारेटची मागणी करीत पोलिसांच्या अंगावर थुंकणाऱ्याला पकडून त्याला चांगलाच काठ्यांचा प्रसाद दिला. पुण्यातील कोथरूड परिसरात ही घटना घडली. अमित कुमार (रा. बिहार) असे या तरुणाचे नाव आहे. चार-पाच पोलीस एका तरुणाला बेदम मारहाण करीत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडिया व्हायरल झाला होता. यासंबंधीची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता हा व्हिडिओ कोथरूड येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्याने पोलिसांशी गैरवर्तन केल्याने त्याला चोप दिल्याचे यातून समोर आले आहे.
संबंधित व्यक्ती बेघर असून तो महापालिकेच्या शेल्टर होममध्ये राहतो. मागील दोन दिवसांपासून तो शेल्टर होममधील इतरांना त्रास देणे, घाण करणे, घराच्या काचा फोडणे असे कृत्य करीत होते. आज सकाळी शेल्टर होममधून तो पळून गेल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस त्याला पकडून परत आत जाण्यास सांगितले. परंतु, आत न जाता तो पोलिसांनाच शिवीगाळ करू लागला आणि त्यांच्या अंगावर थुंकला. त्यानंतर संतापलेल्या पोलिसांनी त्याला बाहेर काढून काठ्यांचा प्रसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोर्ट आणि पोलिसांसमोरील इतर कामे पाहता त्याच्यावर अद्यापतरी गुन्हा दाखल केला नाही. सध्या त्याला शेल्टर होममध्येच ठेवण्यात आले आहे.
Curfew In Pune | पुणे, पिंपरी चिंचवड सील; हवेली तालुका, बारामती नगरपरिषद हद्दही सील
पुणे शहरात कर्फ्यू
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण पुणे शहर मध्यरात्रीपासून बंद करण्यात आलं आहे. पुढील सात दिवसात शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त सकाळी 10 ते 12 सुरु राहणार आहेत. पुण्यात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जाणार असून जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय कुठल्याच कारणासाठी बाहेर पडू नये, असं पोलिसांनी आवाहन केलं आहे. तर, सोमवार म्हणजेच आजपासून पुणे जिल्ह्यातील लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे.
पालघरमध्ये घडलेल्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लॉकडाऊनचे नियम
- संक्रमणशील क्षेत्र वगळता इतर ठिकाणी उद्योग सुरु करायचे असल्यास ते स्थानिक कामगार किंवा कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करावे लागणार आहेत.
- संक्रमणशील क्षेत्रातून कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा कामगाराला या उद्योगांच्या ठिकाणी जाता येणार नाही.
- संक्रमणशील क्षेत्राच्या बाहेर असे उद्योग सुरु करायचे असल्यास त्या उद्योगांना त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची तेथेच राहण्याची सोय करावी लागेल.
- आयटी कंपन्यांना देखील हे नियम लागू असेल.
- हे निकष पूर्ण करणाऱ्या उद्योगांनाा परवानगी.
- एका अर्थाने हे निकष पूर्ण करा आणि उद्योग सुरु करा असं प्रशासनाचं सांगणं आहे. हे निकष पूर्ण करुन किती उद्योग सुरु होत आहेत हे आताच सांगता येणार नाही.
Maharashtra Lockdown | पुण्यात जिल्हा परिषदेकडून गरजूंना जेवण