मुंबई : पालघरमध्ये घडला तो प्रकार निंदनीय आहे. परंतु त्यावरून सरकारवर आरोप करणे अयोग्य आहे. पालघर प्रकरणातील मुख्य आरोपी आज तुरूंगात आहे. पोलिसांसमोर हे हत्याकांड झाले हे खरं आहे. परंतु गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


मॉब लिंचिंगसारख्या लांच्छनास्पद घटना पालघरजवळील गडचिंचली या दुर्गम पाड्यात घडली आहे. यामध्ये कोणतेही धार्मिक कारण नाही.  मॉब लिंचिंग घडलं ते गाव पालघरपासून 110 किमी अंतरावर आहे. दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ हा प्रकार घडला. दोन साधू गुजरातला या दुर्गम भागातून जात होते. गैरसमजुतीने त्यांची हत्या झाली . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संवाद साधला.त्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल सरकारकडे मागितला आहे. ही  घटना रात्री जेव्हा घडली तेव्हा एवढ्या रात्री पोलीस पोहचले. पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांनी आरोपींना पकडलं. आम्ही कारवाई केलेली आहे. पालघर प्रकरणात 110 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 9 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.  त्यातील मुख्य पाच आरोपींना तुरूंगात डांबले आहे. या प्रकरणावरुन राजकारण नको असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.


CM Uddhav Thackeray | पालघरमध्ये घडलेल्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



 संकट टळलेलं नाही, लॉकडाऊन संपलेला नाही, रुतलेलं अर्थचक्र पुन्हा हळू सुरु करत आहोत. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये शिथिलता दिली आहे . गेल्या 36  तासांत राज्यात 835  नवे रूग्ण सापडले आहे. लॉकडाऊन लवकर कसं संपेल हे आपल्याच हातात आहे, संकट टळलंय या भ्रमात कुणीही राहू नका. लॉकडाऊन नसल्यासारखी गर्दी होणे गंभीर आहे. लॉकडाऊन उठवले नाही. ही केवळ शिथिलता आहे, आपण बंधनमुक्त नाही. जर नियमांचे पालन केले नाही तर पुन्हा बंधने टाकण्यात येतील, असा इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.