Lumpy Pune : प्राण्यांना होणाऱ्या लम्पी (lumpy) विषाणूचा संसर्ग राज्यभरात कमी होत आहे. त्यात लम्पी रोखण्यात पुणे (Pune) अव्वल ठरलं आहे. मृत्युमुखी झालेल्या पशुंपैकी सर्वांत कमी मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले आहेत. पुणे जिल्ह्यात केवळ 633 तर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात सर्वाधिक 4,510 पशुंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला लम्पी रोखण्यात यश आलं आहे. 

लसीकरणामुळे नियंत्रण मिळण्यात यशलम्पी आजार पसरण्याला सुरुवात होताच पुणे जिल्ह्यात लसीकरणावर (Vaccination) भर दिला होता. पुणे जिल्ह्यात तातडीने केलेल्या लसीकरणामुळे पशुंचे मृत्यू रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आल्यामुळे जिल्ह्यातील मृत्युदर कमी आहे. राज्यात अनेक शहरात लसीकरणावर भर दिला नव्हता त्यामुळे लम्पीमुळे मृत्यू झाले. लसीकरण करा, असं आवाहन करण्यात येत होतं. योग्य उपाययोजनादेखील करणं गरजेचं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना केल्याने पुणे जिल्हा जनावरांचा मृत्यू रोखू शकला. 

राज्यातील परिस्थीती काय?राज्यात 35जिल्ह्यांमध्ये तीन लाख 54 हजार 247 पशुंना संसर्ग झाला आहे. त्यापैकी दोन लाख 71 हजार 465 पशू उपचाराने बरे झाले आहेत; मात्र 24 हजार 767 पशुंचा मृत्यू झाला आहे. नुकसान भरपाईपोटी जनावरांच्या मालकांना 29 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. एक कोटी 39 लाख 47 हजार पशुंचे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. 

पुणे जिल्ह्यात लम्पी रोग रोखण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यात आलं. त्यासाठी सरकारी वाहनं उपलब्ध करुन देण्यात आली. तसंच दीड लाखांहून अधिक लसदेखील खरेदी करण्यात आल्या. रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात आल्या होत्या. दूध संघांनी केलेल्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच आजपर्यंत पुणे जिल्ह्यात 633 जनावरे बाधित असून त्यातील 38 जनावरांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 633 जनावरांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील हा आकडा राज्यातील आकडेवारीच्या तुलनेत कमी आहे,' असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. लम्पीमुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत पुणे जिल्हा बाराव्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले.

कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यू?बुलढाणा - 4110अहमदनगर - 2928अमरावती - 2393जळगाव - 2339सोलापूर -1823अकोला - 1470सातारा - 1079सांगली - 910औरंगाबाद - 845जालना - 696वाशिम - 666पुणे - 633