पुणे : राज्याचं लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे (Baramati Loksabha Constituency) लागलं आहे. सुरुवातीला पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) बारामतीतून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. काहीही झालं तरी निवडणूक लढवणार असल्याचा चंग विजय शिवतारेंनी बांधला आहे. त्यातच शिवतारेंनी अजित पवारांवरदेखील अनेकदा हल्लाबोल केला आहे. अजित पवारांचा उर्मटपणा गेला नाही. त्यामुळे लोक त्यांना मतदार करणार नाही, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेतेदेखील शिवतारेंवर हल्लाबोल करताना दिसत आहे. विजय शिवतारे यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. शिवतारेंच्या मागे कोणाचं तरी मोठं पाठबळ आहे, त्यामुळे शिवतारे एवढं बोलत आहेत, असा दावाही मिटकरींनी केला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, विजय शिवतारे प्रचंड खालच्या पातळीवरचे विधान करत आहे. त्यामुळे त्यांना महायुतीत त्यांना का ठेवलं आहे, हे पाहावं लागणार आहे. शिवतारेंचे कार्यकर्तेदेखील गुंडेशाहीची भाषा करताना दिसत आहे. त्यामुळे शिवतारेंना नेमकं कोणाचं पाठबळ आहे हे पाहावं लागणार आहे.
एवढं काहीही बोलायची शिवतारेंची कुवत नाही!
काही दिवसांपूर्वी शिवतारे अजित पवारांसमोर लोंटांगण घातल होते. आता तेच शिवतारे अजित पवारांवर हल्लाबोल करताना दिसत आहे. विजय शिवतारे यांची कुवत आम्हाला माहित आहे. शिवतारे कसे आहेत हेदेखील आपल्याला माहित आहे. एवढं काहीही बोलायची शिवतारेंची कुवत नाही. त्यांच्या मागे कोणाचातरी हात आहे, असा दावाही मिटकरींनी केला आहे.
महादेव जानकर बारामतीतून लढणार या चर्चेला काही अर्थ नाही!
लोकसभेच्या किती जागा मिळतील आणि कुणाकुणावर जबाबदारी दिली जाईल हे बैठकीनंतर समजेल.सातही मतदार संघात आमचा दावा कायम आहे. महादेव जानकर बारामतीतून लढणार या चर्चेला काही अर्थ नाही परभणीतून ते लढतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
Shivaji Adhalrao Patil Join NCP :आढळराव पाटील आज हाताला धड्याळ बांधणार; शिरुरमध्ये घडामोडींना वेग